मुंबई

अनंत नर यांची आमदारकी कायम

CD

अनंत नर यांची आमदारकी कायम
याचिकाकर्त्या अपक्ष उमेदवाराला साडेतीन लाखांचा दंड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाततून निवडून आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) नेते अनंत नर यांच्या आमदारकीला आव्हान देणारी अपक्ष उमेदवाराची याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. चुकीच्या पद्धतीने याचिका केल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्याला साडेतीन लाख रुपये दंडही ठोठावला.
नर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी निवडणूक याचिका अपक्ष उमेदवार रोहन साटोणे यांनी केली होती. या याचिकेवर नुकतीच न्या. अभय अहुजा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा चुकीच्या पद्धतीने याचिका केल्याचे निरीक्षण नोंदवून नर यांनी वकिलांवर केलेल्या खर्चाची त्यांना परतफेड करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, याचिकाकर्त्याला साडेतीन लाख रुपये दोन आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभा २०२४च्या निवडणुकीत नर यांनी ७७,०४४ मतांनी विजय मिळवला. नर यांनी शिवसेनेच्या मनीषा वायकर (एकनाथ शिंदे) यांचा १,५४१ मतांनी पराभव केला. याचिकाकर्ता साटोणे हे अपक्ष उमेदवार होते, यावर्षी ४ जानेवारी रोजी याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान, नर यांच्या वतीने उपस्थित वकील अमित कारंडे यांनी याचिकेतील मूलभूत त्रुटींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. सुनावणीदरम्यान प्रत्येकवेळी साटोणे यांच्या वतीने वकील अनुपस्थित राहून, बदली वकीलही उभा केला नाही अथवा काही ना काही कारण पुढे करून सुनावणीसाठी पुढील तारीख मागत होते. वारंवार असे घडल्यानंतर प्रतिवादी नर यांना याचिकेला उत्तर देण्यासाठी झालेला खर्च परत मिळण्याचा अधिकार असल्याचा दावा करून हा खर्च याचिकाकर्त्यावर लादण्यात यावा, अशी मागणी नर यांच्या वतीने ॲड. कारंडे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ४१ वर्षांनंतर निकाल... सर्वोच्च न्यायालयाने ठरवले दोषी पण तुरुंगवासाची शिक्षा माफ, काय होता १९८५ मधील खटला?

लोकांच्या घरात आश्रय ते गळक्या घरात संसाराची सुरुवात; शेर शिवराज फेम अभिनेत्याने उलगडला स्ट्रगलचा काळ

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

War Impact on Grape : युद्धाचा द्राक्ष दरावर परिणाम नाही; जिल्ह्यात ३० टक्के शिल्लक, उन्हाळ्यामुळे मागणीत वाढ, रमजानचाही परिणाम

धाडस केलं आणि टोकं अमाऊंट भरूनच टाकली... मराठमोळ्या इन्फ्ल्युएन्सरने मुंबईत घेतलं स्वतःचं घर; शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT