हसन मुश्रीफ यांना दिलासा
मुंबई, ता. २५ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फसवणुकीच्या आरोपाअंतर्गत दाखल प्रकरण बंद करण्याचा अहवाल सादर केल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली. या पार्श्वभूमीवर न्या. अजय गडकरी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने मुश्रीफ यांनी केलेली याचिका निकाली काढली. याप्रकरणी न्यायालयाने मुश्रीफ यांना अटकेपासून आधीच अंतरिम दिलासा दिला होता. कोल्हापुरातील मुरगूड पोलिस ठाण्यात २३ फेब्रुवारी २०२३ रोजी मुश्रीफ यांच्याविरुद्ध विवेक कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, हा गुन्हा ‘राजकीय हेतूने प्रेरित षडयंत्र’ असल्याचे सांगून तो रद्द करण्यात यावा तसेच निकाल येईपर्यंत अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी करणारी याचिका मुश्रीफ यांनी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.