मुंबई

मराठीसाठीची ठाकरे बांधूची एकजूट पालिकेतही दिसावी!

CD

मराठीसाठीची ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी!
ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मनातील तळमळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मराठी भाषेवर होणारे हिंदीचे आक्रमण हाणून पाडण्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने भव्य संयुक्त मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यानेच राज्य सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. त्यामुळे मराठीसाठी झालेली ठाकरे बंधूंची एकजूट मुंबई महापालिका निवडणुकीतही दिसायला हवी. मुंबई आणि मराठीवर होणारे आक्रमण परतवण्यासाठी त्यांनी यापुढेही हातात हात घालून चालावे, अशी तळमळ तळागाळातील ज्येष्ठ शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे.
राज ठाकरे यांना एका मुलाखतीत राज-उद्धव एकत्र येण्याबाबत विचारले असता, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही दोघे एकत्र येणे कठीण गोष्ट नाही, महाराष्ट्र खूप मोठा आहे, आमच्यातील वाद किरकोळ असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्‍यानंतर राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबत काढलेल्या अध्यादेशामुळे हिंदीचे मराठीवर आक्रमण होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मनसेच्या पुढाकाराने ५ जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्याचे ठरले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते या मोर्चामध्ये एकत्र दिसणार होते. ठाकरे बंधू मराठीसाठी एकत्र आल्याने राज्य सरकारने नमते घेत हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे जून्याजाणत्या शिवसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आलेले ठाकरे बंधू भविष्यातही राजकीय व्यासपीठावर एकत्र राहिल्यास मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाला चांगले दिवस येतील, अशी भावना ज्येष्ठ शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मराठी माणसासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेमध्ये वेळोवेळी पडलेल्या फुटीमुळे नेहमीच मराठी माणसाला दुःख झाले आहे, मात्र आता मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची बाब समाधानकारक असून, पालिका निवडणुकीतही हीच एकी कायम दिसायला हवी.
- बळीराम राणे, ज्येष्ठ शिवसैनिक

सध्या मुंबईत मराठी विरुद्ध इतर भाषिक अशी विभागणी होताना दिसत आहे, मात्र मराठी माणूस वेगवेगळ्या गटात विभागला असून, त्याचा समोरच्याला फायदा होतो. त्यामुळे मोर्चासाठी एकत्र येण्यास तयार झालेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कायम एकत्र आल्यास मुंबईत नक्कीच एकीचे बळ दिसेल. आम्हा शिवसैनिकांना एकीचे हे बळ पुन्हा पाहायचे आहे.
- गंगाराम एकतपुरे, शिवसैनिक

मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, ही मोठी समाधानाची आणि मनाला दिलासा देणारी बाब आहे. हीच एकी राजकीय पटलावरही यावी, ही मराठी माणसाची आणि ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आमची भावना आहे. त्यामुळे मराठी माणसाला बळ मिळणार असले आहे, मात्र राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील.
- सूर्यकांत लाडे, ज्येष्ठ शिवसैनिक

मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्यानेच राज्य सरकारला माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे भविष्यातही मराठीसाठी एकी कायम राहिल्यास मराठी माणसाला आणखी बळ मिळेल, मुंबईत मराठी माणसाचे वर्चस्व कायम राहील.
- नितीन डिचोलकर, ज्येष्ठ शिवसैनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT