मुंबई

डेटिंगवरून वाद झाल्यानंतर तरूणीस ३२ व्या मजल्यावरून ढकलले

CD

डेटिंगवरून वाद झाल्यानंतर तरुणीस ३२व्या मजल्यावरून ढकलले
भांडुप प्रकरणाचा उलगडा; अल्पवयीन तरुणाविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : डेटिंगवरून झालेल्‍या वादातून भांडुप पश्चिमेकडील महिंद्रा स्प्लेंडर इमारतीत २४ जून रोजी घडलेल्या १६ वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ अखेर उलगडले. इमारतीच्या ३२व्या मजल्यावरील (गच्चीवरील) पाण्याच्या टाकीवरून या तरुणीस तिच्याच मित्राने (वय १६) धक्का देत खाली ढकलल्याचे भांडुप पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले. त्याआधारे घटनेनंतर विसंगत माहिती देत पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या या तरुणाविरोधात हत्या, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या कलमांनुसार सोमवारी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला.
मुलुंड येथे आपल्या आईसोबत राहणारी तरुणी मित्राला भेटण्यासाठी तो राहत असलेल्या महिंद्रा स्प्लेंडर इमारतीत आली. घरी जाण्याऐवजी हे दोघे ३२व्या मजल्यावर गच्चीत गेले. तेथे त्यांनी काही काळ गप्पा मारल्या; मात्र काही वेळाने ही तरुणी तेथून खाली पडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणीस मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. भांडुप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी, तपास सुरू केला.
लिफ्ट असताना तो दोन जिने उतरून ३०व्या मजल्यावर आला. ही कृती त्याने घटना घडण्याआधी नव्हे तर घटनेनंतर केली. त्यावरून घटना घडली तेव्हा तो तरुणीसोबतच हजर होता, हे स्पष्ट झाले.
३१व्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेने या दोघांचा वाद आणि किंकाळी ऐकली होती. काय झाले हे पाहण्यासाठी बाहेर आलेल्या महिलेस हा तरुण नजरेस पडला. तेव्हा त्याने काहीच न घडल्याचा आव आणला. गच्चीवर वाद झाल्याचे त्याने पोलिसांपासून लपवले होते. पुढे तो रेफ्युज एरियात शोधाशोध करताना आढळला. संकुलातील जीममध्ये जाऊन त्याने तेथील नोंदवहीतील स्वतःची नोंद खोडल्याचे आढळले. सहाय्यक आयुक्त जितेंद्र आगरकर, वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक जाधव आणि पथकाने तपासात हाती आलेले तपशील पुढे ठेवल्यावर तरुणाने गुन्हा कबूल केला.


सीसीटीव्ही, साक्षीदारामुळे बनावाला सुरुंग
मृत तरुणीचा मोबाईल घटनास्थळावरून लांब मिळाल्याने पोलिस साशंक होतेच. त्यात सीसीटीव्ही चित्रण आणि साक्षीदारांच्या माहितीवरून हा तरुण खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच घटनेनंतरच्या संशयास्पद हालचालींमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले.

आरोपीकडून आत्महत्येचा बनाव
सीसीटीव्ही चित्रणात मृत तरुणी आणि आरोपी तरुण सोबत इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत येताना दिसले. पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवली. त्याच्याकडे चौकशी केली. ती माझी मैत्रीण असून मला भेटण्यासाठी आली होती. ३२व्या माळ्यावर गप्पा मारताना कमी मार्क मिळाल्याने पुन्हा त्याच इयत्तेत बसावे लागेल, ही चिंता तिला सतावत असल्याचे समजले. तसेच शाळेत अन्य विद्यार्थिनी तिची थट्टा करीत असल्याने ती निराश होती. याविषयी चर्चा झाल्यानंतर मी खाली (३०व्या मजल्यावर) उतरलो. त्यानंतर तिने खाली उडी मारली, असा दावा सुरुवातीला या तरुणाने केला.

धक्काबुक्की जीवावर बेतली
घटनेच्या काही दिवस आधी या मैत्रिणीने (मृत तरुणी) इन्स्टाग्रामद्वारे प्रपोज केले होते. मात्र हे नाते मैत्रीपर्यंत मर्यादित ठेवू, असे सांगत आपण तिची मागणी फेटाळली. त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या भेटीत तरुणीने आपल्याकडे डेटसाठी आग्रह धरला. त्यावरून कडाक्याचा वाद झाला. रागाच्या भरात तिने मला ढकलले. त्यामुळे मीही भडकलो आणि तिला जोरदार धक्का दिला. तेव्हा आम्ही दोघे गच्चीवरील पाण्याच्या टाकीवर होतो. माझ्या धक्क्यामुळे ती खाली पडली, अशी माहिती आरोपी तरुणाने उघड केली. घटनेनंतर तिचा मोबाईल हेतुपुरस्सर लांब फेकला होता, असेही त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT