मुंबईकरांची विठूरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती
पंढरपूर वारीसाठी १४० गाड्यांचे आरक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून, पंढरपूरसाठी १३० जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३० जूनपर्यंत ६२ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, तर पंढरपूरहून येणाऱ्या ७८ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मुंबईतील नागरिकांना भाविकांना सुलभतेने पंढरपूरला जाता यावे, यासाठी मुंबई विभागाच्या पाचही आगारांतून विशेष १३० बसेस पंढरपूरला सोडण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच येतानादेखील १३० गाड्यांची व्यवस्था असणार आहे. ग्रुप बुकिंग असेल, तर थेट गावातूनच पंढरपूरला बस सोडण्यात येणार असल्याचेही एसटी विभागाकडून सांगण्यात आले.
६ जुलैला सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला दर्शनासाठी जातात. एसटी प्रशासनाकडून दरवर्षी जादा बसेसची सोय करण्यात येते. यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या वाढत्या मागणीनुसार एसटी प्रशासनाकडून आणखी बसेस वाढवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, उरण आणि पनवेल या आगारांमध्ये बसचे नियोजन करण्यात येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात आणि विठूरायाच्या चरणी नतमस्तक होतात. वारकऱ्यांचा ओघ बघता रेल्वे, बसेसची सोय शासनाकडून दरवर्षी केली जाते. त्याला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो.
आगारनिहाय बस आरक्षण
आगार - ग्रुप आरक्षण - आरक्षण - एकूण आरक्षित बस
मुंबई सेंट्रल -०- १९-१९
परळ - २ -१२ - १४
कुर्ला - ३ - ९ - १२
पनवेल - ४ -० -४
उरण - ९ - ४ - १३
एकूण -१८- ४४- ६२
रायगड जिल्ह्यातील २५ बसेस मदतीला
आषाढी एकादशीनिमित्त विभागातून १३० विशेष बसेस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये मुंबईतून १०५ बस असतील. मुंबई विभागातील असलेल्या बसेसची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या भाविक-भक्तांच्या सुविधेसाठी रायगड जिल्ह्यातील आगारांतून २५ बसेस मागविल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.