मुंबई

मालवाहतूकदारांचा संप स्थगित

CD

मालवाहतूकदारांचा संप स्थगित
३० जुलैपर्यंत सरकारला मुदत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः येत्या ३० जुलैपर्यंत मालवाहतूकदारांना लावलेला दंड आणि मोठ्या गाड्यांवर क्लिनर नसल्याने लावण्यात येणारा दंड याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविणार आहे. तोपर्यंत कोणताही दंड लावण्यात येणार नाही. तसेच ई चलानबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आश्वासन दिल्याने माल वाहतूकदारांनी शुक्रवारी (ता. ४) संध्याकाळी संप स्थगित केला.
वाहतूक बचाव समिती महाराष्ट्र राज्य व राज्यातील सर्व प्रमुख वाहतूक संघटना प्रमुख यांची शुक्रवारी मंत्रालयात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याबरोबर बैठक झाली. त्यात येत्या ३० तारखेपर्यंत सरकारला वेळ देण्यात आली आहे. येत्या ३० तारखेपर्यंत मुंबईमध्ये व इतर ठिकाणी लावण्यात येणारा दंड, मोठ्या वाहनांमध्ये क्लिनर नसल्यामुळे लागणारा दंड याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात येणार आहे, तोपर्यंत दंड लावण्यात येणार नाही. ई चलानबाबत लावलेला दंड माफ करावा, याबाबत सरकार अध्यादेश काढून लवकरच याबाबत चुकीच्या पद्धतीचे ई-चलान ज्यामध्ये दोष आढळेल, अशी चलान यांचा दंड लावला जाणार नाही, ९० दिवसांपेक्षा जास्त ज्या चलानचे दंड लागले आहेत ते दंड लागणार नाहीत, तसेच संपूर्ण राज्यात पार्किंग करताना चुकीचे कोणतेही चलान लावले जाणार नाही, असे सरकारने मान्य केले. त्यामुळे २५ दिवस सरकारला वेळ देण्याचे ठरवले असून संप तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.
...
८० टक्के मालवाहू वाहने बंद
मालवाहतूकदारांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी राज्यातील सुमारे ८० टक्के मालवाहू वाहने बंद होती. ट्रक, टेम्पो, कंटेनर यांसह अन्य मालवाहू वाहने ट्रक टर्मिनलजवळील वाहनतळात उभी आहेत. यामुळे ट्रक टर्मिनलजवळील सर्व वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरले आहेत, असे बाबा शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT