मुंबई

थेट शाळेत एसटी पासला पसंती

CD

थेट शाळेत एसटी पासला पसंती
राज्यातील पाच लाख २१ हजार विद्यार्थ्यांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : शाळेत जाण्यासाठी एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाकडून विविध योजनेंतर्गत थेट शाळेतच पास वितरित करण्यात येत आहे. १६ जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर मागील १५ दिवसांत राज्यातील पाच लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्यातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. केवळ ३३.३३ टक्के रक्कम भरून मासिक पास थेट शाळेतच उपलब्ध केला जातो. या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शाळेत जाऊन एक लाख ६१ हजार २०४ विद्यार्थ्यांना पास वितरित केले. त्याचप्रमाणे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत पास वितरित केले जातात. याअंतर्गत तीन लाख ६० हजार १५० विद्यार्थिनींना शाळेत पास देण्यात आले. आतापर्यंत विद्यार्थ्यांना नजीकच्या एसटी आगारात जाऊन पास काढावे लागत होते, मात्र एसटी प्रशासनामार्फत ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेचा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
----
शालेय बस फेऱ्या रद्द करू नयेत!
राज्यातील अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एसटीवर अवलंबून आहेत. आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दिवसभरात एकच बस फेरी उपलब्ध असते. त्यातही ती रद्द झाल्यास त्यांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे प्रत्येक आगारप्रमुखांनी शालेय फेरी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT