वरळीत मराठीचा आवाज घुमणार
दोन्ही पक्षांकडून मेळाव्याची जय्यत तयारी
प्रभादेवी, ता. ४ (बातमीदार): पावसाळी अधिवेशन सुरू असले, तरी चर्चा मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याची सुरू आहे. हिंदी भाषासक्ती रद्द केल्यानंतर शनिवारी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या विजयी मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, आसन व्यवस्था, एलईडी स्क्रीन आणि ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. शनिवारी होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी दोन्ही पक्षांकडून मेळाव्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. व्हीआयपी नेत्यांसाठी वरळी डोममध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, येणाऱ्या कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी रेस्कोर्स तसेच कोस्टल रोड पुलाखाली पार्किंग करावी, असे मनसेचे शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. संपूर्ण माहीम विधानसभा ते वरळी परिसरात महाराष्ट्राच्या नकाशासह फक्त मराठीचा अजेंडा असलेल्या आशयाचे बॅनर लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.