मुंबई

शाळाबाह्य मुलांच्या भवितव्याशी खेळ

CD

मुंबई, ता. ५ ः राज्यातील विविध सामाजिक कारणे, स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी १ जुलैपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात चार दिवसांमध्ये केवळ काही हजार कुटुंबांपर्यंतच शोधमोहिमेतील कर्मचारी पोहोचले असल्याने यंदाही शाळाबाह्य मुलांचा शोध नीट होऊ शकणार नाही, अशी भीती शिक्षणविषयक अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
मुंबईसह राज्यातील विविध शाळांमध्ये स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम १५ जुलैपर्यंत चालणार आहे. या मोहिमेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणारे काही शिक्षक, समग्र शिक्षा आणि इतर विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत. दिवसाला फक्त २५० कुटुंबांपर्यंतही हे कर्मचारी पोहोचत नसल्याचे दिसून आले आहे, पण मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात विविध भागातून स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या काही लाखांच्या घरात असते. यामुळे या सर्वेक्षणात शिक्षण क्षेत्रातातील विविध संस्थांचा सहभाग केल्यास लाखो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होईल, असे मत सिस्कॉम संस्थेचे संचालक राजेंद्र धारणकर यांनी सांगितले.
----------------------------------------
‘सेवाभावी संस्थांचा सहभाग हवा’
राज्यातील विविध भागांमध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम सुरू आहे. १५ जुलैपर्यंत ही मोहीम होणार आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध सेवाभावी संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींना सामावून घेतल्यास शाळाबाह्य मुलांचा खरा शोध घेता येईल. यामुळे शिक्षण विभागाने अशा संस्थांच्या सहभागासाठी पावले उचलावीत, अशी मागणी समर्थन संस्थेचे शिक्षणविषयक प्रमुख रूपेश कीर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT