मुंबई

‘जेजे’मध्ये हिप सर्जरीचे थेट प्रक्षेपण

CD

‘जे. जे.’मध्ये हिप सर्जरीचे थेट प्रक्षेपण
राज्यातील १५ वैद्यकीय महाविद्यालयांचा सहभाग; अमेरिकेतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयात ऑर्थोपेडिक विभागातर्फे देशभरातील सरकारी रुग्णालयांतील ऑर्थोपेडिक सर्जन आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना हिप रिप्लेसमेंट सर्जरीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी २१ व २२ जुलै रोजी दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टर थेट सर्जरी करत प्रशिक्षण देणार आहेत. ही प्रक्रिया राज्यातील १५ वैद्यकीय महाविद्यालयांना थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.
या कार्यशाळेत अमेरिका येथील नामवंत हिप सर्जन डॉ. शिराज पटेल डायरेक्ट अँटेरियर अप्रोच या पद्धतीने हिप रिप्लेसमेंट सर्जरी करणार असून, ही आधुनिक पद्धत मांसपेशींना बाधा न आणता सर्जरी पूर्ण करण्यास उपयुक्त ठरते. पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत सुरक्षित असून, रुग्णाला लवकर बरे वाटते, अशी माहिती ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. नादिर शाह यांनी दिली.
ही कार्यशाळा जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्या निर्देशानुसार, अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या उपक्रमात वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. रजत शेट्टी, डॉ. प्रियंका मीणा, डॉ. कुशल गोहिल आणि डॉ. संतोष घोटी हेही सहभागी होणार आहेत. कार्यशाळेसाठी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये विशेष उपकरणे बसवण्यात आली असून, या माध्यमातून महाराष्ट्रातील इतर महाविद्यालयांना थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.
----------------------------------
रुग्णांसाठी धोका कमी
पूर्वी ही शस्त्रक्रिया रुग्णाच्या पाठीमागून किंवा बाजूने केली जायची, मात्र त्यात जास्त चिरफाड होत असे. नव्या तंत्रज्ञानामुळे चिरफाड कमी होते, त्यामुळे रक्तस्त्राव आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो आणि रुग्ण लवकर बरा होतो, असे डॉ. शाह यांनी सांगितले.
---------------------------------
MUM25E97221

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT