मुंबई

डेसिबल मर्यादांमध्ये सुधारणेची गरज : सना मलिक- शेख

CD

डेसिबल मर्यादांमध्ये सुधारणेची गरज : सना मलिक-शेख
मुंबई, ता. ११ : पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ठरवलेली ध्वनिप्रदूषण मर्यादा सध्याच्या परिस्थितीत अपुरी ठरत असून याकडे आमदार सना मलिक-शेख यांनी धार्मिक कार्यक्रमातून होणाऱ्या ध्वनिप्रदूषण विषयावर लक्षवेधीमध्ये आज सभागृहाचे लक्ष वेधले.

२००० मध्ये ध्वनिप्रदूषण कायदा बनविण्यात आला. त्यामध्ये रहिवासी भागात दिवसा ५५ आणि रात्री ४५ इतकी डेसिबल मर्यादा आहे. तर व्यावसायिक भागात दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसिबल व औद्योगिक परिसरात दिवसा ७५ आणि रात्री ७० डेसिबल मर्यादा आहे; मात्र आजच्या घडीला ही डेसिबल मर्यादा पार केली गेली आहे, त्यामुळे या मर्यादांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो; परंतु राज्यात याबाबत सर्व्हे करून तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे एकमताने पाठवला तर आपल्याला नवीन डेसिबल मर्यादांमध्ये सुधारणा मिळू शकते, असे सांगत सना यांनी सभागृहातील डेसिबल मर्यादा ६०च्यावर आहे, हेही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय खरा आहे, असे सांगत या मुद्द्यावर सखोल विचार करून सुधारित मर्यादांसंदर्भात शिफारस केंद्र सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: गोपीनाथ मुंडेंची तिसरी लेक राजकारणात; यशश्री मुंडेंचा उमेदवारी अर्ज, प्रितम मुंडे बिनविरोध?

UGC NET Result: UGC NET निकाल कधी लागणार, जाणून घ्या मागील वर्षांचा ट्रेंड काय सांगतो?

Pune News : आयटी पार्कसह उद्योगांच्या समस्या सोडवा; विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची सूचना

Neeraj Chopra: ऑलिंपिक रौप्य विजेत्या नीरज चोप्राला आता सुवर्णपदकाचा ध्यास; तांत्रिक बाबींमध्ये सुधारणेचा प्रयत्न

Shirur Accident : शिरूरमध्ये दुर्दैवी अपघात; पिकअप टेम्पोची धडक, दुचाकीवरील दोन तरुण ठार

SCROLL FOR NEXT