मुंबई

मुंबई विद्यापीठात भाषिक वारशाचे संवर्धन

CD

मुंबई विद्यापीठात भाषिक वारशाचे संवर्धन

‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची होणार स्थापना

मुंबई, ता. १२ : मुंबई विद्यापीठात भारतातील समृद्ध भाषिक वारशाचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धन होणार आहे. यासाठी विद्यापीठात लवकरच ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन हेरिटेज लँग्वेजेस ॲण्ड मल्टी-कल्चरल स्टडीज’ची स्थापना केली जाणार आहे.
या केंद्राच्या माध्यमातून लुप्त होत चाललेल्या भाषा आणि सांस्कृतिक परंपरांच्या संशोधन, संवर्धन आणि प्रचार केला जाणार आहे.

मुंबई विद्यापीठात स्थापन करण्यात येणाऱ्या या केंद्रात प्रामुख्याने ‘अवेस्ता-पहलवी’, ‘पाली’ आणि ‘प्राकृत’ या प्राचीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या मौल्यवान भाषांवर भर दिला जाणार आहे. या भाषांतील साहित्य, बहुमूल्य ग्रंथ, हस्तलिखिते आणि शिलालेखांचे संशोधन व जतन हे या केंद्राच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. या प्रस्तावित केंद्राच्या स्थापनेच्या अनुषंगाने नुकतेच विद्यापीठात ‘हेरिटेज लँग्वेजेस अँड कल्चर’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय परिसंवादासाठी मुख्य अतिथी म्हणून अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार हे उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादासाठी अल्पसंख्याक मंत्रालयाचे सहसचिव राम सिंह, अल्पसंख्याक मंत्रालयाचे उपसचिव श्रवण कुमार, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि या केंद्राचे नोडल अधिकारी प्रा. शिवाजी सरगर यांच्यासह ‘अवेस्ता-पहलवी’, ‘पाली’ आणि ‘प्राकृत’ भाषेचे समन्वयक आणि अभ्यासक उपस्थित होते.
परिसंवादात उपस्थितांना संबोधित करताना डॉ. चंद्रशेखर कुमार म्हणाले, भारतातील या प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भाषांचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत चित्रफिती तयार करण्यात याव्यात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या पुढाकारामुळे देशातील अन्य विद्यापीठे या प्रकल्पाचे अनुकरण करतील.
या एकदिवसीय परिसंवादाचे यशस्वी आयोजन या केंद्राचे नोडल अधिकारी प्रा. शिवाजी सरगर यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman : हिंदू संस्कृतीने भारावून गेलेली रशियन महिला मुलांसह आढळली गोकर्णच्या जंगलात; गुहेत तिच्यासोबत काय घडलं?

Latest Marathi News Updates : शरद पवारांच्या पक्षात भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदेंचे नाव चर्चेत

साप्ताहिक राशिभविष्य : (१३ जुलै २०२५ ते १९ जुलै २०२५)

आशियाई अन्‌ विश्‍वकरंडकाच्या तयारीला वेग

पांढरी होणारी दाढी अन् निवृत्ती (एक काल्पनिक कथा)

SCROLL FOR NEXT