मुंबई

आधारिका फाउंडेशनकडून शालेय साहित्य वाटप

CD

आधारिका फाउंडेशनकडून शालेय साहित्य वाटप
मुंबई, ता. १३ : मुंबईतील आधारिका फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या शाळेतील बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय कुटुंबातील असून, शाळेची स्थितीही हलाखीची असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनांची कमतरता भासत होती.
विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आदी साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल नवी उमेद निर्माण झाली असून शाळेचे मुख्याध्यापक व पालकांनी आधारिका फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. संस्थेने भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या उपक्रमात फाउंडेशनचे संस्थापक व संचालक विनायक मोरे, संचालक संतोष मेळेकर, लेखाप्रमुख प्रसाद मोरे आणि आयटीप्रमुख प्रदीप पांचाळ यांनी सहभाग घेतला. स्थानिक पातळीवर शहापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना तारमाळे व केतन वेखंडे यांनीही मोलाची मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

हिंदी मालिकेत झळकणार स्टार प्रवाहची गाजलेली नायिका; साकारणार मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?

Indeed AI : आता मित्र समजून ChatGPT कडे मागा नोकरी! रिमोट जॉब असो किंवा वर्क फ्रॉम होम, सगळंकाही मिळणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT