मुंबई

दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीत संस्थाचालकांकडून उमेदवारांची छळवणूक!

CD

संस्थाचालकांकडून पैशांची मागणी
शिक्षक भरतीबाबत उमेदवारांची नाराजी
मुंबई, ता. १३ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेच्या मुलाखती सुरू आहेत. यामध्ये काही अनुदानित संस्थाचालकांनी उमेदवारांची आर्थिक मागणी करीत छळवणूक सुरू आहे. मुलाखतीदरम्यान लाखो रुपयांची मागणी केली जात असल्याने शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले शेकडो तरुण उमेदवार हैराण झाले आहेत.
काही संस्थाचालकांनी गुणवत्तेच्या आधारे समोर आलेल्या उमेदवारांना कोणतीही तक्रार न करता आपल्याकडे मुलाखत घेऊन रुजू करून घेत आहेत; मात्र या संस्थांची संख्या अत्यल्प असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे संस्थाचालकांना देण्यात आलेल्या मुलाखतीचे सर्व अधिकार काढून घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे. राज्यात शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू असून त्यात शिक्षकांच्या आठ हजार ५५६ रिक्तपदांची भरती केली जात आहे. पवित्र पोर्टलच्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार, मुलाखतींचे छायाचित्रण करणे अपेक्षित आहे. मुलाखत, वर्ग निरीक्षण आणि विद्यार्थी गुणसंख्येला प्रत्येकी दहा गुण दिले जाणार आहेत.
--
कोट
शिक्षक अभियोग्यता चाचणी झाल्यानंतर या संस्थेमध्ये पात्र उमेदवाराला पाठवले जाते, त्याची मुलाखत इन कॅमेरा झाली पाहिजे. त्यातून योग्य उमेदवारांची निवड होईल.
- शिवनाथ दराडे, कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद
--
ज्या उमेदवारांच्या मुलाखती व वर्ग निरीक्षण केले जाणार आहे, त्याचे छायाचित्रण संस्थाचालकांकडे आहे. यामध्येही काही उमेदवार अपेक्षित गुणवत्ता सिद्ध करू शकलेले नाहीत.
- जागृती धर्माधिकारी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ
--
शिक्षक भरतीच्या मुलाखतीबाबत सर्व प्रक्रिया मूल्यमापनसुद्धा इन कॅमेरा होणे आवश्यक आहे.
- तानाजी कांबळे, प्रमुख, पुरोगामी शिक्षक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Kolhapur Viral Video Case : कोल्हापूर शिरोली अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील नवी अपडेट समोर, शाहरुख निघाला सरकारी नोकर

Pakistan Petrol Crisis: पाकिस्तानमधलं तेलं संपलं! खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी व्यक्त केली खंत; म्हणाले भारताला एका सहीवर...

Video Viral: रियान परागवर बंदी? ड्रेसिंगरूममध्ये 'व्हॅपिंग' करताना दिसला; BCCI कठोर कारवाईच्या तयारीत

Latest Marathi News Live Update : मस्साजोगमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

SCROLL FOR NEXT