मुंबई

आरामदायी मेट्रो प्रवासाची स्वप्नपूर्ती

CD

आरामदायी मेट्रो प्रवासाची स्वप्नपूर्ती
आजपासून तीन नवीन गाड्या ताफ्यात दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : धक्काबुक्कीशिवाय मेट्रो प्रवास करता यावा म्हणून महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओसीएल) ताफ्यात तीन नव्या कोऱ्या मेट्रो ट्रेन दाखल करण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे अंधेरी-दहिसर-गुंदवली मार्गावर आजपासून गर्दीच्या वेळी २१ फेऱ्या वाढणार असून, तीन लाखांहून अधिक मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गारेगार आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाकडे मुंबईकरांचा मेट्रोने प्रवास करण्याकडे कल आहे. यामुळेचे मेट्रो २ आणि ७ या मार्गावरील प्रवासी संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. प्रवासाचा हाच अनुभव अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने एमएमआरडीएने मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार तीन नव्या मेट्रो गाड्या सेवेत दाखल झाल्या असून, बुधवारपासून ३०५ फेऱ्या होणार आहेत. तसेच अतिरिक्त २१ वाढीव फेऱ्यांसाठी तीन नवीन ट्रेन तैनात केल्याने कार्यरत ट्रेनची संख्यादेखील आता २१ वरून २४ झाली आहे.
------------------------------------------------
फलाटावरील गर्दीवर नियंत्रण
गर्दीच्या वेळांमध्ये मेट्रो येण्याचा वेळ आता ६ मिनिटे ३५ सेकंदांवरून ५ मिनिटे ५० सेकंदांवर आणण्यात आला आहे. यामुळे फलाटांवरील गर्दी कमी होणार असून, प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे. गर्दीच्या वेळा नसताना फेऱ्यांच्या वारंवारतेमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्या फेऱ्या पूर्वीप्रमाणे ९ मिनिटे ३० सेकंदांच्या अंतरानेच सुरू राहणार आहेत.

ग्राफिक्स
- दैनंदिन प्रवासी - ३ लाखांहून अधिक
- मेट्रो ट्रेन - २४ (आधी -२१)
- दैनंदिन फेऱ्या - ३०५
- दोन फेऱ्यांमधील वेळ - ५.५० मिनिटे ( आधी ६.३५ मिनिटे)
---------------------------------
दर आठवड्याला मेट्रोतून प्रवास करणारी प्रवासी संख्या सुमारे पाच टक्क्यांनी वाढत आहे. त्यामुळे फेऱ्या वाढविण्याचा हा निर्णय म्हणजे आकडेवारीवर आधारित नियोजन, जलद अंमलबजावणी आणि प्रवाशांना प्राधान्य या प्रशासनाच्या भूमिकेचे द्योतक आहे.
- डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए
------------------------------------------
प्रवासी संख्या तीन लाखांहून अधिक असल्याने मेट्रोच्या वाढत्या लोकप्रियतेचे आणि यशस्वी कार्यप्रणालीचे स्पष्ट निदर्शक आहे. गर्दीच्या वेळांमधील प्रवासी संख्येचा सखोल अभ्यास करून २१ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
- रुबल अग्रवाल, एमडी, एमएमएमओसीएल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात; पाहा थेट प्रक्षेपण

Video: अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस गणेशोत्सवानंतर स्वच्छता मोहिमेत सहभागी, समुद्रकिनाऱ्याची केली साफसफाई

लालबागच्या राजाचं विसर्जन कसं करायचं? गुजरातहून खास अत्याधुनिक तराफा आणला, पण मूर्ती चढवण्यात अडचणी

US Open जिंकल्यानंतर सबलेंका पत्रकार परिषदेत थेट शॅम्पेनची बॉटलच घेऊन आली, काय म्हणाली पाहा Video

Sindhudurg Railway : सिंधुदुर्गात रेल्वे स्थानके तुडुंब, परतीचा प्रवास; वाहतूकीचे वेळापत्रक कोलमडले, चाकरमान्यांचे हाल

SCROLL FOR NEXT