मुंबई

गणपतीसाठी एसटीच्या पाच हजार बस

CD

गणपतीसाठी एसटीच्या पाच हजार बस
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : गणरायाच्या आगमनासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून, कोकणात एसटीच्या जादा पाच हजार बसचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाने २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान या जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते गणपती उत्सवाच्या जादा वाहतुकीच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘‘गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या-तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यंदा सुमार पाच हजार जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील.’ दरम्यान, या बसच्या आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, या बसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे. आषाढी एकादशीच्या यात्रेसाठीदेखील एसटी महामंडळाने पाच हजार दोनशे जादा बस सोडल्या होत्या. त्याला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे गणपती उत्सवासाठीदेखील एसटीने तब्बल पाच हजार जादा बस उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे.

२२ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात
गणपती उत्सवासाठी जादा बसमध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकीटदरात सवलत दिली जाणार आहे. हे गट आरक्षण २२ जुलैपासून सुरू होत आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बस सोडण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी ४,३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT