मुंबई

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये बॉम्बची अफवा

CD

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये बॉम्बची अफवा

मुंबई, ता.१५ : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या फिरोज टॉवर इमारतीत चार शक्तिशाली बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

केरळचे मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पॉलित ब्युरो सदस्य कॉ. पिनारी विजयन यांच्या नावे धमकीचा ई-मेल स्टॉक एक्स्चेंजला प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (ता. १३) हा ई-मेल प्राप्त झाला. हा मेल सोमवारी (ता. १६) स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचाऱ्याने पाहिला आणि पोलिसांना कळवले. या ई-मेलमध्ये आरडीएक्स वापरून तयार करण्यात आलेले चार इम्प्रोवाईस्ड एक्सप्लोजीव डिव्हाइस (आयइडी) फिरोज टॉवर इमारतीत ठेवण्यात आले असून, ठीक दुपारी ३ वाजता त्यांचा स्फोट होईल, असे नमूद होते. याची माहिती मिळताच सोमवारी सकाळी पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने स्टॉक एक्स्चेंजचा कानाकोपरा पिंजून काढला. यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने ती अफवा असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी ई-मेल धाडणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला. या व्यक्तीने ई-मेल धाडण्यासाठी वापरलेल्या आयपी ॲड्रेसची माहिती मिळविण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेकडून सुरू आहे. १९९३ मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील एक स्फोट बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इमारतीत घडविण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Womens Reservation Bill: मुस्लिम महिलांच्या मुद्द्यावरुन अमित शाह संतापले; अखिलेश यादव यांना जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Pat Cummins:तो येतोय... काव्या मारनच्या गालावरील खळी आणखीन फुलणार; SRH च्या ताफ्यात भारी खेळाडू दाखल

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

SCROLL FOR NEXT