मुंबई

वन्यजीवांमुळे संक्रमित आजारांचा धोका

CD

वन्यजीवांमुळे संक्रमित आजारांचा धोका
देशातील विमानतळांवर बेकायदा तस्करीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळांवर सरपटणारे प्राणी, विदेशी पक्षी आणि लहान सस्तन प्राणी मोठ्या प्रमाणावर जप्त केले जात आहेत. हे प्राणी कोंबलेले, तणावाखाली तसेच मृतावस्थेत आढळतात. त्यामुळे प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढल्याने दावा वन्यजीव रक्षकांकडून केला जात आहे.
देशभरातील विमानतळांवर बॅगांमध्ये कोंबलेले विदेशी सरपटणारे प्राणी, पक्षी आणि लहान सस्तन प्राण्यांची तस्करी केली जाते. अनेकदा हे प्राणी मृत, काही मरणासन्न असतात. वन्यजीवांच्या बेकायदा तस्करीचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. कारण या माध्यमातून झुनोटिक आजार म्हणजे प्राण्यांकडून माणसांमध्ये संक्रमित होणाऱ्या आजारांचा धोका बळावला आहे. या आजारांचे संक्रमण थेट संपर्क, अन्न, पाणी, हवेतील कण किंवा कीटकांद्वारे होऊ शकते. त्यामुळे वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन यांनी विदेशी प्रजातींच्या संगरोध, वैद्यकीय तपासणी, पुनर्वसन आणि पुनरुत्पादन प्रक्रियेसाठी राष्ट्रीय स्तरावर एकसंध, शास्त्रीय आणि कायदेशीर नियमावलीची गरज अधोरेखित केली आहे. याबाबतचे निवेदन सीआयटीईएस भारत, पर्यावरण मंत्रालय, डब्ल्यूसीसीबी, सेंट्रल झू अथॉरिटी, प्राणी संगरोध सेवा आणि डीजीसीएसह महाराष्ट्र वन विभागाला सादर करण्यात आले आहे.
------------------------------------------------------
नियमावलीची गरज
भारतात वाढत्या बेकायदा विदेशी वन्यजीव तस्करीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शास्त्रीय हाताळणीसाठी सुधारित नियमावली लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन (OIPA), अम्मा केअर फाउंडेशन (ACF) आणि प्लांट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी (PAWS-Mumbai) या तीन प्रमुख संस्थांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही मागणी केंद्र, राज्य सरकारकडे केली असल्याचे ओआयपीएच्या महाराष्ट्र प्रतिनिधी निशा कुंजू यांनी सांगितले.
.......
झुनोटिक आजार म्हणजे काय?
प्राण्यांकडून माणसांमध्ये संक्रमित होणाऱ्या आजारांना ‘झुनोटिक आजार’ असे संबोधतात. या आजारांचे संक्रमण थेट संपर्क, अन्न, पाणी, हवेतील कण किंवा कीटकांद्वारे होऊ शकते. यामध्ये कोविड-१९, बर्ड फ्ल्यू, स्वाइन फ्ल्यू, ब्रुसेलोसिस, रेबीज, एंथ्रॅक्स, टीबी, निपा व्हायरस, इबोला, साल्मोनेलोसिस आदी आजारांचा समावेश आहे.
-----------------------
प्रमुख मागण्या, शिफारसी :
- विमानतळांवर संगरोध आणि पुनर्वसन केंद्रे स्थापन करावीत.
- प्रत्येक जप्त प्राण्याची वैद्यकीय तपासणी व झुनोटिक चाचणी अनिवार्य करावी.
- विमान कंपन्यांसाठी कठोर नियमावली असावी.
- नियमभंग करणाऱ्यांना दंड व पुनर्वसन खर्चाची जबाबदारी द्यावी.
- सीआयटीईएसमार्फत एकसंध राष्ट्रीय एसओपी तयार करावी.
.........
मुंबई विमानतळावर वन्यजीव संगरोध व उपचार केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे, अन्यथा प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय, प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत.
- सुनिष सुब्रमण्यन, वन्यजीव रक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Latest Marathi News Updates : राज ठाकरेंचा उद्या मीरा रोड दौरा

SCROLL FOR NEXT