मुंबई

कामगार विमा योजनेचे विस्तारीकरण

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या वेळी महाराष्ट्रातील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयांबाबत सविस्तर चर्चा केली. या वेळी केंद्रीय आरोग्यसेवा योजनेच्या दरांमध्ये लवकरच सुधारणा केली जाईल, असे मांडविया यांनी सांगितले.
राज्यात कामगार विमा सोसायटीची १५ रुग्णालये असून योजनेची संलग्नित असलेलया ४५० खासगी रुग्णालये व १३४ सेवा दवाखान्याच्या माध्यमातून कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. राज्यात सद्यःस्थितीत ४८ लाख ७० हजार ४६० विमाधारक कामगार असून, कामगार व त्यांचे कुटुंबीय मिळून सुमारे दोन कोटी नागरिक विमा योजनेचा लाभ घेतात. सद्यःस्थितीत २१ हजार रुपये मासिक उत्पन्न असलेल्या कामगारांना विमा योजनेचा लाभ घेता येतो. ही उत्पन्न मर्यादा ३० हजार रुपयेपर्यंत वाढवण्याची मागणी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांकडे करण्यात आली.
--------------------------------------------
श्रेणीवाढ करणार
अंधेरी, कोल्हापूर, उल्हासनगर येथील कामगार रुग्णालयांची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करून कार्यान्वित करण्यासाठी कामगार महासंचालकांना सूचना देण्यात येतील. तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील कामगार रुग्णालयाची श्रेणीवाढ करण्याबाबतही विचार केला जाईल, असे डॉ. मांडविया यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Whatsapp Web गंडलं! स्क्रोल करताना अनेक अडचणी; सारखं रिफ्रेश करून वापरकर्ते हैराण झाले

TikTok वरुन भारतात बंदी हटणार? मंत्री अश्विनी वैष्णव अफवांवर म्हणाले, लवकरच.....

Asia Cup 2025: संजू सॅमसनसोबत तिसऱ्या दिवशी नेट प्रॅक्टिसमध्ये काय घडलं? IND vs UAE सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळणार संधी

Latest Marathi News Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब, हिमाचल प्रदेशमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

MUHS summer exam 2025 : ‘एमयुएचएस’च्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने; राज्यातील १३ हजार विद्यार्थी प्रविष्ट

SCROLL FOR NEXT