मुंबई

राज्यभर परिचारिकांचा बेमुदत संप सुरूच

CD

राज्यभर परिचारिकांचा बेमुदत संप सुरूच
निर्णय होईपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : परिचारिकांच्या मागण्यांसाठी सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने लवकर संयुक्त बैठक घ्यावी, अशी संघटनेकडून मागणी केली जात आहे. राज्यभर परिचारिकांचा बेमुदत संप सुरूच असून, निर्णय होईपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
परिचारिकांची कंत्राटी भरती रद्द करून शंभर टक्के कायमस्वरूपी पदभरती करावी, या प्रमुख मागणीसह पदनिर्मिती, सेवा प्रवेश नियमावलीतील त्रुटी दूर कराव्यात, अशा राज्यातील परिचारिकांच्या प्रलंबित मागण्या आहेत. या मागण्या सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग, अशा दोन्ही विभागांशी निगडित आहेत. त्यामुळे या दोन्ही विभागांची संयुक्त बैठक येत्या दोन दिवसांत घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केली आहे. १५ जुलैपासून आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने धरणे आंदोलन केले आहे, तर गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष अरुण कदम व सचिव सुमित्रा तोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपाध्यक्ष भीमराव चक्रे, सुकुमार गुडे उपस्थित होते.
या वेळी सुमित्रा तोटे म्हणाल्या, गेल्या चार दिवसांपासून परिचारिकांचे आंदोलन सुरू आहे. विविध मागण्यांसाठी वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाची संयुक्त बैठक व्हावी. मागण्यांवर तोडगा न निघाल्याने हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे.
...
शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
- राज्यातील ३० हजार शासकीय परिचारिकांनी केलेल्या कामबंद आंदोलनाचा परिणाम आरोग्यसेवेवर झाला असून, शासकीय रुग्णालयांमधील नियमित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत.
- या आंदोलनात मुंबईतील जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, जी. टी. रुग्णालय व कामा या सरकारी रुग्णालयांतील परिचारिका सहभागी झाल्या आहेत.
- परिचारिकांच्या कामबंद आंदोलनाची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने योग्य खबरदारी घेत रुग्णसेवा बाधित होणार नाही याची काळजी घेतली.
- रुग्णालयातील शिकाऊ परिचारिका व वरिष्ठ श्रेणी असलेल्या परिचारिकांची वॉर्ड व शस्त्रक्रियागृहामध्ये नियुक्ती केली.
- दुसऱ्या दिवशीही नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून, अत्यावश्यक असलेल्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले.
- शुक्रवारी फक्त दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT