मुंबई

‘आयटीआय’मध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर कारवाई

CD

‘आयटीआय’मध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर कारवाई
लोढा यांची ठाम भूमिका

मुंबई, ता. १८ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेताना अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक दोन्ही सवलतींचा गैरफायदा घेतलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे स्पष्ट केले.
विधान परिषदेत २६०च्या प्रस्तावावर उत्तर देताना त्यांनी हा इशारा दिला. खोट्या मार्गाने मिळवलेले फायदे थांबवून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत स्पष्ट केले होते की, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख समाजातील नागरिकांनाच मर्यादित आहे. इतर धर्मांतील काहींनी जर अशी जात प्रमाणपत्रे वापरून हा लाभ घेतला असेल, तर त्यांच्या प्रमाणपत्रांची वैधता रद्द करण्यात येईल आणि त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. सरकार यासंदर्भात आणखी प्रभावी उपाययोजना करण्याच्या तयारीत असल्याचेही लोढा यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: भावी अधिकाऱ्यांचे भवितव्य टांगणीला! ‘एमपीएससी’ला अंतिम निकालाचा मुहूर्त मिळेना, जाहिरात निघून दोन वर्षे उलटली..

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर, सरकारने जारी केली ही महत्त्वाची नोटीस

Solapur News: २० टक्के प्रमाणपत्रे खोटी! साेलापूरात कामगारांना अनुभव प्रमाणपत्र देणारे ठेकेदारही बोगस;'कामगार मंडळा’कडून तपास सुरू..

Ajay Devgn: ‘शैतान २’चा इशारा? दोन वर्षांनंतर अजय देवगच्या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढवली!

Latest Marathi News Live Update : वाळुज एमआयडीसीतील उद्योगांवर गॅस टंचाईचा परिणाम

SCROLL FOR NEXT