मुंबई

२० हजार कुटुंबांना सुरक्षा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : शहर आणि उपनगरांतील म्हाडाच्या संक्रमण शिबिरांत २० हजार कुटुंबे वास्तव्याला आहेत. पण अनेक ठिकाणी सातत्याने घुसखोरी होत आहे. त्यामुळे संक्रमण शिबिरांच्या सुरक्षेसाठी म्हाडा उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे.
मुंबई शहरात १९व्या शतकात उभारलेल्या १९ हजारांहून अधिक उपकरप्राप्त इमारती आहेत. त्या अतिधोकादयक झाल्यानंतर येथील रहिवाशांची म्हाडाकडून संक्रमण शिबिरांत तात्पुरती व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी म्हाडाची शहर, उपनगरांत ३७ ठिकाणी संक्रमण शिबिरे असून, तब्बल २० हजार सदनिका आहेत. मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्रचित इमारत उभ्या राहिल्यानंतर संक्रमण शिबिरातील रहिवाशांना स्थलांतरित केले जाते. त्यामुळे रिकाम्या होणाऱ्या संक्रमण सदनिकेत घुसखोरी होते. अनेक जण त्याची परस्पर विक्री करतात. अशा घुसखोरांची ओळख पटवून त्यांना बाहेर काढणे कठीण होते. तसेच त्यावरील न्यायालयाचा खर्चदेखील अधिक असल्याने संक्रमण शिबिरांतील घुसखोरी रोखण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे संक्रमण शिबिरांतील घुसखोरी कमी होऊ शकणार आहे.
--------------------------------------------
गाळ्यांची परस्पर विक्री
उपकरप्राप्त इमारतीच्या जागी पुनर्रचित इमारत उभारल्यानंतर संक्रमण शिबिरांतील संबंधित रहिवाशांना हक्काची सदनिका दिली जाते. वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरांत वास्तव्याला असलेल्या अनेक रहिवाशांनी कोणत्याही कल्पनेशिवाय संक्रमण शिबिरातील गाळा इतर व्यक्तीला विक्री केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालता यावा, त्याची माहिती मिळावी म्हणून सीसीटीव्हीचा यंत्रणा लावली जाणार आहे.
-----------------------------------------
दलालांना रोखण्यासाठी खबरदारी
संक्रमण शिबिरांतील घुसखोरी दलालांच्या मध्यस्थीने, सुरक्षा रक्षकांच्या निष्काळजीपणामुळे होते. त्यामुळे म्हाडाच्या रेकॉर्डवर असलेले आणि संशयित दलालांना संक्रमण शिबिरांत प्रवेश करता येऊ नये, म्हाडाच्या परवानगीशिवाय संक्रमण शिबिरांत कोणी वास्तव्याला आल्यास त्याची माहिती मिळावी, म्हणून म्हाडाकडून सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.
-----------
संक्रमण शिबिरांची ठिकाणे
- गोरेगाव
- मालाड मालवणी
- गोराई, बोरिवली
- चुनाभट्टी
- प्रतीक्षानगर, सायन
- सहकारनगर, विक्रोळी
- शिवडी
- पेरू कम्पाउंड, लालबाग
- ओशिवरा
- बिंबिसारनगर
- सहकारनगर, चेंबूर
- कुलाबा
- वडाळा
- धारावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : इराण-इजरायल युद्धावरून सोलापुरात राजकीय वातावरण तापलं

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT