मुंबई

मुंबई विद्यापीठाचा स्थापनादिन साजरा

CD

मुंबई, ता.१९ : गौरवशाली आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाने प्रशासकीय गुणवत्ता पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने अवलंबलेल्या युडीआरएफ (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क) अंतर्गत सात वर्गवारीतून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पुरस्कारांमध्ये केंद्रीय मूल्यांकन प्रक्रिया विभाग, वित्त व लेखा विभाग, शैक्षणिक नियुक्त्या आणि गुणवत्ता हमी, दक्षता आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सावित्रीबाई फुले विद्यार्थीनी वसतिगृह, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी वसतिगृह आणि अल्केश दिनेश मोदी वित्तीय व व्यवस्थापन संस्था या प्रशासकीय विभागांना १ लाखांचे अनुदान देऊन तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार या विभागांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. नीतिन करमळकर, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत यांनी व्याख्यानमालेतून उपस्थितांशी संवाद साधला.
---------------------------------
मुख्य निकषांवर पुरस्कारांचे मूल्यांकन
युडीआरएफसाठी पाच मुख्य निकषांवर पुरस्कारांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये फॅकल्टी आऊटपूट, रिसर्च अँड प्रोफेशनल एक्टीव्हीटी, एनईपी इनिशिएटिव्ह्स, टिचिंग, लर्निंग अँड असेसमेंट प्रोसेस, डिपार्टमेंटर गव्हर्नंस अँड प्रॅक्टिस, स्टूडेन्ट सपोर्ट, अचिव्हमेंट अँड प्रोग्रेसन,कॉन्फरन्स, वर्कशॉप अँड कोलॅबोरेशन्स यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

Latest Marathi Live Update: आसाम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज

Latur Police Bharti: लातूरमध्ये पोलिस शिपाई भरतीची आज लेखी परीक्षा; ३२८ उमेदवार सज्ज

Unseasonal Rain: राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली; १७ ते २० मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT