मुंबई

उकाड्यामुळे घामाच्या धारा

CD

उकाड्यामुळे
घामाच्या धारा

मुंबईत आर्द्रता ८० टक्क्यांवर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : शहरात तुरळक पाऊस सोडल्यास जुलैमध्ये पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता वाढली असून आर्द्रता ८० टक्क्यांवर पोहोचल्याने मे महिन्यासारखे जाणवत आहे. सारखा घाम पुसावा लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

जुलैमध्ये साधारणत: सर्वाधिक पावसाची नोंद होते; मात्र पावसाने काही दिवसांपासून दडी मारली आहे. आज मुंबईत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस इतके असल्याचे हवामान विभागाने सांगितले. रविवारीदेखील उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार, शहर आणि उपनगरांत आकाश अंशतः ढगाळ असून संध्याकाळी किंवा रात्री गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, कोकण परिसरात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
वाढत्या उकाड्यामुळे थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे यांसारख्या आजाराच्या तक्रारी वाढत आहेत. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि हृदयविकाराचे रुग्ण यांच्यासाठी हे हवामान घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT