मनपा मुख्यालय ठरतेय नवे टुरिस्ट स्पॉट
२० हजार पर्यटकांचा दौरा पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालयाची सहल मागील साडेचार वर्षांत तब्बल २० हजार पर्यटकांनी केली आहे. ही वास्तू पाहण्यासाठी मुंबईकरांसह देश-विदेशातून पर्यटक मुंबईत दाखल होत आहेत. पुरातन वास्तुशैली, प्रशासनिक वारसा आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने भव्यता यामुळे मनपा मुख्यालय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
या सहलींचे आयोजन महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि खाकी टूर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक शनिवार व रविवारी आयोजित केली जाते. रविवारी (ता. २०) २० हजाराव्या पर्यटकाचे औपचारिक स्वागत करण्यात आले.
इंडो-सार्सानिक स्थापत्यशैली
मनपा मुख्यालयाची वास्तू ही इंडो-सार्सानिक स्थापत्यशैलीतील एक अत्यंत देखणी रचना असून, १६ जानेवारी १८९३ पासून येथे प्रशासकीय कामकाज सुरू आहे. ही इमारत सुमारे २३५ फूट उंचीच्या मनोऱ्याने सजलेली असून, तिचे संकल्पचित्र सुप्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद एस. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी तयार केले होते. ११.१९ लाख रुपये खर्च करून ही वास्तू उभारली असून, बांधकामाची जबाबदारी व्यंकू बाळाजी या महात्मा फुलेंच्या निकटवर्ती ठेकेदाराने पार पाडली होती.
दर आठवड्याला सहा सहली
सध्या दर आठवड्याला मिळून एकूण सहा सहली घेतल्या जातात. या सहलीदरम्यान, पर्यटकांना मुंबईच्या नागरी विकासाची गाथा, महापालिकेचे ऐतिहासिक योगदान, स्थापत्यवैभव आणि प्रशासकीय कार्यपद्धती यांची माहिती मिळते. सहलीसाठी प्रवेश शुल्क ३५० रुपये असून, नोंदणी बुक माय शोवर करता येते, अशी माहिती संयोजक भरत गोठोसकर यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन ऐतिहासिक वारशाचे जतन करीत असून, नागरी सेवांच्या जोडीने शहराच्या सांस्कृतिक समृद्धीला प्रोत्साहन दिले जात आहे. या वास्तूचा दौरा केवळ एक पर्यटक अनुभव नसून, तो मुंबईच्या विकासयात्रेचा जिवंत इतिहास अनुभवण्याची संधीदेखील देत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.