मुंबई

मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे ‘मेगाहाल’

CD

मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे ‘मेगाहाल’


मुंबई, ता. २७ : श्रावण महिन्याचा पहिला सोमवार तसेच नागपंचमीसारख्या पारंपरिक सणाच्या खरेदीसाठी रविवारी (ता. २७) मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवास केला. मात्र नियोजित मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचा प्रवास अक्षरशः रखडला. मध्य आणि हार्बर मार्गावरील सेवांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हजारो प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.

रविवारच्या वेळापत्रकानुसार अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नियमित वेळेपेक्षा कमी लोकल सेवेत होत्या. त्यातच ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत, तर पनवेल-वाशी मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ५.०५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉकअंतर्गत काही लोकल रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या. काही लोकल गाड्यांना निवडक स्थानकांवरच थांबवण्यात आले. या अनपेक्षित बदलामुळे सीएसएमटी, ठाणे, डोंबिवली, कल्याण, वाशी आणि पनवेल यांसारख्या मुख्य स्थानकांवर दिवसभर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी प्रवाशांनी नाराजी व्यक्त करीत रेल्वे प्रशासनावर टीका केली. अनेक जण उभ्याने प्रवास करताना दिसले, तर काहींना गाड्यांमध्ये चढण्यासाठीसुद्धा संघर्ष करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: मँचेस्टरमध्ये ड्रामा! स्टोक्सने कसोटी संपल्यावर जडेजा, वॉशिंग्टनसोबत खरंच हस्तांदोलन टाळलं? Video Viral

ENG vs IND: जडेजासोबत इंग्लंडच्या खेळाडूंची बाचाबाची? मँचेस्टर कसोटीच्या शेवटी नेमकं काय घडलं? पाहा Video

ENG vs IND, 4th Test : टीम इंडिया लढली, भडली अन् मँचेस्टर कसोटीही वाचवली! गिलपाठोपाठ जडेजा, वॉशिंग्टनचीही शतकं

Crime News: भाजप नेत्याचा मुलाला ड्रग्जसह अटक! युवतीसोबत पळून जाताना थांबवले तर पोलिसांच्या अंगावर घातली गाडी

Dhananjay Munde: ...तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT