मुंबई

नेत्रहीन गोविंदा पथकाचा सरावाचा उत्साह

CD

दिव्यांग गोविंदा पथकाचा सराव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबईत दहीहंडीचा सराव सुरू झाला आहे. यात नेत्रहीन गोविंदा पथकांनी सराव सुरू केला आहे. माटुंगा पूर्व येथील वीर मेजर रमेश दादकर मैदानात दररोज संध्याकाळी एक वेगळीच उत्साही गर्दी पाहायला मिळते. नयन आणि आधारिका फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली नेत्रहीन मुला-मुलींचे ‘गोविंदा पथक’ आपल्या खास पद्धतीने सराव करत आहे. पाहणाऱ्यांना थक्क करणारी ही बाब म्हणजे हे सर्व विद्यार्थी नेत्रहीन असूनसुद्धा दहीहंडीचा दिवसरात्र सराव करतात.

प्रत्येक वर्षी गोविंदाच्या उत्सवापूर्वी एक महिना या मुलांचे पथक सायंकाळी सराव करत आहे. ‘आम्ही पाहू शकत नाही, पण आमचा उत्साह खूप मोठा आहे. आम्ही कोणत्याही सामान्य गोविंदा पथकासारखेच हे कार्य करू शकतो, असं या पथकातील एका सहभागी गोविंदाने सांगितले. सर्व सहभागी ठाणे, पनवेल, बदलापूर, कर्जत, कसारा इत्यादी ठिकाणाहून येतात. अनेक सहभागी विद्यार्थी अत्यंत हलाखीच्या पार्श्वभूमीतील आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घरांतील या मुला-मुलींमध्ये जिद्द, जोश आणि एकमेकांना मदतीचा हात देण्याची तयारी नेहमी पाहायला मिळते.

गोविंदा पथकाच्या उपक्रमातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो की, कोणतीही अडचण ही कधीच यशासाठी अडथळा ठरू शकत नाही. प्रत्येकाने स्वतःच्या मर्यादांवर मात करून कष्ट, सराव आणि जिद्दीच्या जोरावर मोठे स्वप्न पाहावं, हे नेत्रहीन गोविंदा पथक सिद्ध करत आहे. त्यांचा हसरा चेहरा, प्रत्येक सरावातील उत्साह आणि ‘आम्ही ही दहीहंडी उत्सव साजरा करू शकतो,’ हा संदेश प्रत्येकाला नक्कीच भारावून टाकतो, असे आधारिका फाउंडेशनचे संस्थापक आणि संचालक विनायक मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Marathi News Live Update : अकोल्यातल्या दहीहंडामध्ये कडाक्याच्या उष्णतेनंतर पावसाची हजेरी

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

SCROLL FOR NEXT