मुंबई

शहरातील सर्व केमिस्ट पोलिसांच्या रडारवर

CD

शहरातील सर्व केमिस्ट पोलिसांच्या रडारवर
सीसीटीव्ही बंधनकारक करणार; औषधी ड्रग्जच्या अवैध विक्रीवर नजर

जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः नशेसाठी वापर होणाऱ्या औषधी गोळ्या, कफ सिरपची अवैध विक्री रोखण्यासाठी मुंबई पोलिसांसह संबंधित यंत्रणा शहरातील सर्व औषधालयांच्या (केमिस्ट) व्यवसायावर सीसीटीव्हींद्वारे नजर ठेवणार आहेत. त्यासाठी औषधालयांना महिनाभरात नेमक्या ठिकाणी, विशिष्ट अंशात (अँगल) दोन मेगा पिक्सलचे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक असेल.
याबाबतचे फर्मान मुंबई पोलिस आयुक्तांच्या वतीने अमली पदार्थ विरोधी पथकाकडून तयार करण्यात आले आहे. येत्या एक-दोन दिवसांत ते सर्व औषधालयांना जारी होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. या आदेशानुसार औषधालयाच्या प्रवेशद्वारासह ग्राहक नेमके कोणते औषध विकत घेत आहे, हे स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी (विक्री काउंटर) हे सीएसटीव्ही लावणे, त्यात होणारे चित्रण किमान एक महिन्यापर्यंत साठवून ठेवणे बंधनकारक असेल. आदेश जारी झाल्यानंतर ठरवून दिलेल्या मुदतीत (एक महिना) सीसीटीव्ही न लावणाऱ्या औषधालयांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम २२३ नुसार कारवाई केली जाईल. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक दुकानात सीसीटीव्ही उभारणी झाली की नाही याची तपासणी पोलिस पातळीवर होईल, तर प्रतिबंधित सूचीत सहभागी औषधांची अवैध विक्री करणाऱ्या औषधालयांची झाडाझडती अन्न व औषध संचालनालय आणि बालहक्क निरीक्षक घेतील.
...
आदेशाचा हेतू
गेल्या काही वर्षांत कोडेन फॉस्फेटयुक्त कफ सिरप किंवा मानसिक तणावावरील अल्फ्राझोलाम, ट्रामाडोल आदी गोळ्यांचे सेवन अमली पदार्थांप्रमाणे सुरू झाले. या औषधांच्या आहारी गेलेल्यांमध्ये अल्पवयीन बालकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आढळला. ही व अशी औषधे प्रतिबंधित सूचीत सहभागी आहेत. त्यामुळे डॉक्टरच्या वैध चिठ्ठीशिवाय अशा औषधांची विक्री करता येत नाही. तसेच ही औषधे कोणाला किती प्रमाणात विकावी, त्याचा साठा आदींबाबतही नियम आहेत, मात्र तरीही चोरट्या पद्धतीने या औषधांचे उत्पादन, विक्री, व सेवन सुरूच आहे. त्यास चाप लावण्यासाठी नशामुक्त भारत अभियानांतर्गत केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) आणि बालहक्क संरक्षण आयोगाने संयुक्तपणे औषधालयांवर नजर ठेवण्याचा उपाय निश्चित केला.
...
साडेतीन कोटींचे औषधी ड्रग्ज जप्त
गेल्या सहा महिन्यांत फक्त मुंबई पोलिसांनी ४९ गुन्हे नोंदवून सुमारे ७०० लिटर कफ सिरप आणि ३४५ औषधी गोळ्यांच्या स्ट्रीप जप्त केल्या. जप्त औषधांची किंमत ३५ लाखांहून अधिक असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हे मूल्य ३.५ कोटी असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.
...
राज्यात एकूण केमिस्ट - एक लाख
मुंबई शहर, उपनगरांत - सात हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT