मुंबई

रेव्ह पार्टीची संकल्पना गँगवॉरप्रमाणे

CD

रेव्ह पार्टीची संकल्पना गँगवॉरप्रमाणे
कायद्यात उल्लेख, निकष, नियम नाहीत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः देशातील अमली पदार्थविरोधी कायद्यात (एनडीपीएस) रेव्ह पार्टी संकल्पनेचा कुठेही उल्लेख नाही. प्रत्यक्षात पोलिसी भाषेत अंडरवर्ल्ड, कंपनी, गँगवॉर शब्द प्रचलित झाले, त्याचप्रमाणे ‘रेव्ह पार्टी’ हा शब्दही रूढ झाला, अशी माहिती अनुभवी पोलिस अधिकारी आणि वकील देतात.
पोलिस दलातील निवृत्त अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ साबीर याची १९८१ मध्ये प्रभादेवी येथील पेट्रोलपंपावर मन्या सुर्वे आणि साथीदारांनी हत्या केली. त्या गुन्ह्याची नोंद करताना, पहिल्यांदा मुंबई पोलिसांनी टोळीयुद्ध अर्थात गँगवॉर शब्दाचा उल्लेख केला; मात्र कट, समाईक हेतू, हत्या आदी नेहमीचीच कलमे जोडली. म्हणजेच तत्कालीन कायद्यात टोळीयुद्धातून घडलेल्या गुन्ह्यांसाठी विशिष्ट कलमांची तरतूद नव्हती. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधित कायदा (मकोका) अमलात येईपर्यंत टोळीयुद्धातून घडलेली हत्या, संघटित टोळ्यांनी केलेले अपहरण, खंडणीसाठी दिलेली धमकी या गुन्ह्यांसाठी आयपीसीप्रमाणे गुन्हे नोंद होत असे.
एनडीपीएस कायद्यात रेव्ह पार्टीबाबत विशेष तरतूद, निकष आणि नियम नाहीत. या कायद्यानुसार, गांजापासून पार्टी ड्रग्ज, एलएसडीपर्यंत कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन, विक्री, साठवणूक, वाहतूक, उत्पादन, आदी प्रक्रिया गुन्हा ठरतो. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी किंवा खासगी जागेत कोणतीही कृती करणाऱ्या व्यक्तीविरोधात अमली पदार्थ बाळगणे, सेवन करणे गुन्हा असल्याचे एका अन्य अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
---
रेव्ह पार्ट्या कोणत्या?
२००७ मध्ये पुण्यात सिंहगड परिसरात आणि २०११ मध्ये रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या पार्ट्यांना रेव्ह पार्टी म्हणता येईल. त्यात सुमारे सहाशे व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यासाठी मद्य आणि अमली पदार्थांची खुलेआम विक्री आणि सेवन सुरू होते, अशी माहिती केंद्रीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
---
ब्रिटनमध्ये सुरुवात
१९८०च्या दशकात ब्रिटनमध्ये अशा पार्ट्या सुरू झाल्या. ज्या वेगवान संगीत आणि सलग नृत्यासाठी ओळखल्या जात. थकवा दूर करण्यासाठी मद्यासोबत अमली पदार्थांचे सेवन अंतर्भूत झाले. त्याचे लोण युरोप, अमेरिकेत पसरले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
----
पुण्याची ‘ती’ हाउस पार्टी
अमली पदार्थविरोधी यंत्रणांनी अटक केलेल्या आरोपींची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या ॲड. अयाज खान यांनी पुणे पोलिसांनी अलीकडे उद्‍ध्वस्त केलेली पार्टी रेव्ह नसून हाउस पार्टी असल्याचा दावा केला. याशिवाय या कारवाईत जप्त केलेल्या अमली पदार्थांचे प्रमाण व्यावसायिक नसून अगदीच किरकोळ असल्याचेही नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT