बीसीसीआय कार्यालयातून
आयपीएलच्या टी-शर्टची चोरी
मुंबई, ता. २९ : आयपीएल खेळणाऱ्या विविध संघांची २६१ टी-शर्ट वानखेडे स्टेडियम येथील बीसीसीआय कार्यालयातून चोरणाऱ्या सुरक्षा रक्षकास मरीन ड्राइव्ह पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फारुख खान असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. बीसीसीआय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना रविवारी (ता. १३) स्टोअर रूममधून २६१ टी-शर्ट गायब असल्याचे आढळले. या प्रत्येक टी-शर्टचे मूल्य अडीच हजार रुपये इतके होते. सीसीटीव्ही चित्रणात फारुख परवानगी नसताना या स्टोअर रूममध्ये शिरल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी (ता. १६) बीसीसीआयने याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत फारूखने गुन्हा कबूल करत ती टी-शर्ट हरियाणा येथील व्यावसायिकाला विकल्याचे सांगितले. त्यातून आलेली रक्कम ऑनलाइन जुगारात हरल्याचा दावाही त्याने केला असल्याचे पोलिस म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.