IPL 2026 : शतक केलं, GT ला फायनलमध्येही नेलं अन् मग शुभमन गिलनं आई-वडिलांना मैदानातच मारली कडकडून मिठी; Video Viral

Shubman Gill Parents Emotional Hug: गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचान पराभव करत आयपीएल २०२६च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात शुभमन गिलने शतक केले. त्याच्या शतकी खेळीनंतर त्याच्या आई-वडिलांनी मैदानात येऊन त्याचे कौतुक केले.
Shubman Gill Parents Emotional Hug | GT vs RR | IPL 2026

Shubman Gill Parents Emotional Hug | GT vs RR | IPL 2026

Sakal

Updated on

GT vs RR, Qualifier 2 Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील (IPL) अखेर अंतिम २ संघ निश्चित झाले आहेत. शुक्रवारी (२९ मे) गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुल्लनपूरला झालेल्या क्वालिफायर २ सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यामुळे राजस्थान रॉयल्सचे आव्हान संपले.

गुजरातच्या विजयात कर्णधार शुभमन गिलचा (Shubman Gill) वाटा सर्वात मोठा राहिला. त्याने संघाला विजय मिळवून दिल्यानंतर त्याचं त्याच्या आई-वडिलांकडून (Gill's Parents) खास कौतुकही झाले.

Shubman Gill Parents Emotional Hug | GT vs RR | IPL 2026
GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com