मुंबई

पिप्रहवा बुद्ध अवशेष १२७ वर्षानंतर भारतात

CD

पिप्रहवा बुद्ध अवशेष
१२७ वर्षानंतर भारतात

मुंबई/नवी दिल्ली, ता. २ : पिप्रहवा येथील पवित्र बुद्ध अवशेष केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने १२७ वर्षांनंतर भारतात परत आणले आहेत. या अमूल्य ठेव्याचा हाँगकाँगमधील लिलाव थांबवून हे अवशेष भारतात आणले आहेत.

भगवान बुद्धांशी हे अवशेष संबंधित असल्याचे मानले जाते. काही कोटी डॉलर किमतीचे अवशेष हाँगकाँगमधील लिलावात मांडले जात असल्याचे आढळले होते. त्यामुळे खासगी संग्राहकांकडून ते विकत घेतले जाण्याचा धोका होता; पण सांस्कृतिक मंत्रालयाने गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या मदतीने हस्तक्षेप करून हा लिलाव थांबवला आणि ही कलाकृती भारतात परत आणली.

ब्रिटिश सिव्हिल इंजिनियर विल्यम क्लॅक्सटन पेपे यांनी उत्तर प्रदेशातील पिप्रहवा येथून १८९८ मध्ये हे अवशेष शोधून काढले होते. भगवान बुद्धांच्या अनुयायांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकाच्या आसपास हे अवशेष तेथे ठेवले होते असे मानले जाते. हे अवशेष जगभरातील बौद्ध समुदायासाठी आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या प्रयत्नामुळे हे अवशेष पुन्हा भारतात आले. पंतप्रधान मोदी यांनीदेखील समाजमाध्यमावर याबाबत आनंद व्यक्त केला. काही आठवड्यात या अवशेषांचे औपचारिकरित्या अनावरण केले जाईल. नंतर ते सार्वजनिक प्रदर्शनात ठेवण्यात येतील. परराष्ट्र मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे २०१६पासून भारताने अमेरिकेतून ५७८ पुरातन कलाकृती परत मिळवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन चिघळलं

SCROLL FOR NEXT