मध्यान्ह भोजनाच्या सूचनांबाबत संभ्रम
स्पष्टतेची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत
मुंबई, ता. ३ ः राज्यातील शाळांमध्ये मुलांना पुरविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत मध्यान्ह भोजनातील विषबाधा रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत; मात्र त्यात अनेक प्रकारच्या संदिग्धता ठेवण्यात आल्याचे तज्ज्ञ सांगतात. यात शाळा व्यवस्थापन समितीवरही जबाबदारी सोपविण्यात आल्याने या सूचनांवर तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राज्यातील सुमारे १५ हजार शाळांमध्ये मुख्याध्यापकांचे पदच रिक्त असल्याने या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनातील घटनांसाठी कोणावर जबाबदारी निश्चित केली जाणार, असा सवाल शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला आहे.
मध्यान्ह भोजनासाठी जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अन्न विषबाधेसंदर्भात संकल्पना, घटना घडण्याची कारणे, अन्न विषबाधेची घटक, लक्षणे आदींची माहिती देत शाळा व्यवस्थापन समितीवर पुरवठादारांकडून शाळास्तरावर तांदूळ आदी धान्य, त्यांचा दर्जा, पिण्याचे पाणी, आहाराची नियमितता आदी तपासणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे; मात्र शालेय व्यवस्थापन करणारे रोजच्या प्रशासनात रोज हस्तक्षेप करू शकत नाहीत. केवळ मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचाच हस्तक्षेप असतो. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीवर जास्तीची जबाबदारी लावणे योग्य नाही. शिवाय यापूर्वी न्यायालयाने शाळांतील अन्नाच्या तपासणीसाठी फूड इन्स्पेक्टरची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते, त्याची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे हे अतिरिक्त काम शिक्षक, मुख्याध्यापकांवर लादले जात असल्याने त्यातही स्पष्टता आली नसल्याचे शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी म्हटले आहे.
...
अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांवर ताण
अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांवर येणारा कामाचा ताण वाढतच आहे. मोठ्या शाळेमध्ये मुख्याध्यापक सहजासहजी शालेय पोषण आहारावर दैनंदिन नियंत्रण ठेवण्यास वेळच देऊ शकत नाहीत. नव्या संचमान्यतेमुळे शून्य शिक्षक असणाऱ्या शाळा आणि १००च्या आत पट असणाऱ्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद नसणाऱ्या शाळादेखील मोठ्या संख्येवर आहेत. अशा स्थितीत नेमके कोणाला जबाबदार धरणार, असा प्रश्न शिक्षणतज्ज्ञ महेंद्र गणपुले यांनी उपस्थित केला आहे.
...
अस्पष्टता काय?
- केवळ कच्च्या मालावर लक्ष केंद्रित न करता तयार अन्नातील अशुद्धतेचाही विचार करून स्पष्टता हवी.
- शिक्षणाधिकारी आदींवर केवळ नोंदीची तपासणीपुरती जबाबदारी मर्यादित. घटना घडल्यास त्यांच्यावर कोणत्याच कारवाईची तरतूद नाही.
- धान्याच्या सुरक्षेसाठी सायलो टॉवर किंवा आधुनिक एअर टाईट कंटेंटचा वापर ग्रामीण भागात कसा होणार, यासाठी स्पष्टता नाही.
- आयओटी सेन्सर्स आणि स्मार्ट मॉनिटरिंग सिस्टिमद्वारे धान्याच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कोणाची यावरही स्पष्टता नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.