मुंबई

गोरेगाव कन्यापाडा येथील पाणी समस्या कायमची दूर

CD

गोरेगाव कन्यापाडा येथील पाणी समस्या कायमची दूर
मुंबई, ता. ३ : गोरेगाव पूर्व येथील कन्यापाडा परिसरातील दीर्घकालीन पाणी समस्येवर अखेर कायमचा तोडगा निघाला आहे. या भागासाठी मंजूर करण्यात आलेल्या सहा इंच व्यासाच्या जलवाहिनी प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी (ता. ३) पार पडले. याप्रसंगी भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती सातम यांच्या उपस्थितीत स्थानिक रहिवाशांच्या हस्ते कामाची सुरुवात करण्यात आली.
कन्यापाडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा अपुरा असून, पाण्याचा दाब कमी असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याबाबत माजी नगरसेविका प्रीती सातम यांनी सातत्याने पाठपुरावा करत महानगरपालिकेकडे हा विषय गांभीर्याने मांडला होता. त्यांनी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन वस्तुस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर या भागासाठी सहा इंच व्यासाच्या जलवाहिनीला मंजुरी मिळाली असून, पावसाळ्यातही खोदकामास परवानगी देण्यात आली आहे. पूर्वी टाकण्यात आलेली चार इंच व्यासाची जलवाहिनी अपुरी पडत असल्याने नव्याने सहा इंच व्यासाची पाइपलाइन मंजूर करण्यात आली.
प्रीती सातम म्हणाल्या, कन्यापाडा परिसराशी माझे जूने नाते आहे. नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कृती करत मी स्वतः रात्री-अपरात्री पाणी दाब पाहण्यासाठी आले आहे. प्रशासनाला अनेकदा याबाबत सजग केले. अखेर सर्वांच्या एकजुटीने हा प्रकल्प मंजूर झाला, असे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT