दगडी कोळशामुळे हवेचे प्रदूषण
न्यायालयाला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल सादर; बेकरींना ‘हरित ऊर्जे’चाच पर्याय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : बेकरी उद्योगात वापरल्या जाणाऱ्या दगडी कोळशामुळे प्रदूषण होत नसल्याचा दावा करणाऱ्या कोळसा उत्पादकांना झटका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) झटका दिला आहे. बेकरी प्रदूषण प्रकरणात मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात दगडी कोळसा आणि अन्य कुठच्याही प्रकारच्या कोळशामुळे हवेचे गंभीर प्रदूषण होते, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
कोळसा उत्पादकांच्या मागणीवरून उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर मंडळाने कोळसा उत्पादकांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली; मात्र चर्चेनंतरही पर्यावरणीय वास्तव झाकता आले नाही. कोळशाचा वापर थेट हवामान प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे, असे मंडळाने स्पष्ट निष्कर्ष नोंदवल्यामुळे बेकरीचालकांना आता हरित ऊर्जेच्या पर्यायांचा स्वीकार करावा लागणार आहे. एमपीसीबीच्या सविस्तर अहवालानंतर उच्च न्यायालयाकडून लवकरच प्रदूषणविरोधी कडक निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
----
अहवालात काय?
- मुंबई आणि उपनगरांतील कोळसा साठवणूक, हाताळणी आणि वाहतुकीमुळे पीएम १० आणि पीएम २.५ यांसारख्या हानिकारक धूलिकणांचे प्रमाण वाढते.
- या धूलिकणांमुळे दमा, ब्राँकायटिस, ॲलर्जी यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळून श्वसनसंस्थेला हानी पोहोचते.
- कोळशामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा थेट संबंध सार्वजनिक आरोग्याशी असल्याने बेकरीसाठी कोळसा वापरावर निर्बंध लावले जावेत आणि कठोर नियम अमलात आणावेत.
------
कोळसा उत्पादकांचा दावा काय?
कोळसा उत्पादकांनी दगडी कोळशामुळे प्रदूषण होत नाही. ते स्वच्छ इंधन असल्यामुळे बेकरींमध्ये त्याचा उपयोग फायदेशीर असल्याचा दावा केला होता. ‘एमपीसीबी’च्या वैज्ञानिक परीक्षणांनी हा दावा खोटा ठरवून कोणताही कोळसा जळताना सूक्ष्म धूलिकण आणि कार्बन उत्सर्जन करतो, हे सिद्ध केले आहे.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.