मुंबई

कबुतरखान्यासाठी ‘शांती यात्रा यज्ञण’

CD

कबुतरखान्यासाठी
‘शांती यात्रा यज्ञण’
जैन समाजाचे शांततेच्या मार्गाने आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ३ : कबुतरखाना तोडण्याच्या हालचालींचा निषेध करून आज कुलाबा परिसरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. ‘एक पुकार मेरी भी सुने : कबुतरखाना बचाओ’ या हाकेसह शेकडो प्राणिप्रेमी, संत आणि धार्मिक श्रद्धावानांनी ‘शांती यात्रा यज्ञण’मध्ये सहभाग घेतला. महावीर मिशन ट्रस्टने याचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचा शुभारंभ सकाळी ९ वाजता कुलाबा जैन मंदिरात झाला. येथे हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर गणपती मंदिरात आरती करण्यात आली. रामचंद मार्ग मार्गे गेटवे ऑफ इंडियापर्यंत शांततेत यात्रा झाली आणि शेवटी पवित्र जल समर्पण करून शांती यात्रेचा समारोप करण्यात आला.
कबुतरखाना हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर ते जीवदयेचे प्रतीक आहे. कबुतरांना अन्न-पाण्यापासून वंचित ठेवणे ही नैतिक चूक आहे, असे मत यात्रेत सहभागी नागरिकांनी व्यक्त केली. प्रशासनाने या विषयावर व्यापक विचार करावा, संवाद साधावा आणि पर्यायी उपाययोजना करावी, अशी मागणी शांतिदूतांनी केली.
मुंबईच्या रस्त्यांवर शांततेने प्राणिमात्रांच्या हक्कासाठी आवाज उठवला गेला. धर्म, दया आणि संवेदना यांचे प्रतीक असलेला कबुतर आणि कबुतरखाना वाचवण्यासाठी हे आंदोलन हे शांततेतील जागृतीचा संदेश देणारे ठरले, असे माजी नगरसेवक पुरण दोशी यांनी सांगितले.
-------------
श्वसनाचे आजार हे अनेक कारणांमुळे होतात. केवळ कबुतरांची विष्ठा जबाबदार नाही. कोंबड्यांच्या बाजारपेठांतही मोठ्या प्रमाणात विष्ठा आणि घाण आढळते, मग तिथे बंदी का नाही, असा सवाल माजी नगरसेवक पुरण दोशी यांनी महापालिकेला विचारला. या शहरात कबुतरखान्याची ही जागा मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे ती हटवण्यामागे आर्थिक गणिते असल्याचा आरोप त्यांनी केला.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज 1 तोळा सोन्याचा दर किती? पाहा ताजे भाव

‘शाका लाका बूम बूम’मधला संजू झाला बाबा; सोशल मीडियावर केली 'खास' पोस्ट, नेटकरी म्हणाले...'छोटा संजू आता पुन्हा...'

Latest Marathi News Live Update : आखाती तणावाचा परिणाम; हॉटेल व्यवसायिकांना गॅस सिलेंडरचा तुटवडा

Pune News: मतदारांना धमक्या! मतपत्रिका कोरी द्या, अन्यथा नोकरीला मुकाल; ‘मसाप’साठी आमदार, नगरसेवकही सक्रिय..

SCROLL FOR NEXT