मुंबई

धारावीतील पात्र व्यावसायिकांना बांधकाम खर्चात मिळणार अतिरिक्त क्षेत्रफळ

CD

धारावीतील पात्र व्यावसायिकांना बांधकाम खर्चात मिळणार अतिरिक्त क्षेत्रफळ
२४ ऑगस्टपर्यंत संमतीपत्र दाखल करण्याचे आवाहन; व्यावसायिकांना मोठा दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. येथील पुनर्विकासात औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांना २२५ चौरस फूट क्षेत्रफळाचा मोफत गाळा मिळणार आहे. त्यापेक्षा अतिरिक्त क्षेत्रफळाचा गाळा हवा असले तर त्यांच्याकडून वाढीव क्षेत्रफळाचा केवळ बांधकाम खर्च घेतला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी २४ ऑगस्टपर्यंत डीआरपीकडे संमतीपत्र दाखल करावे लागणार आहे. त्यामुळे वाढीव क्षेत्रफळाचा गाळा घेऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही चांगली संधी आहे.
धारावीतील १ जानेवारी २००० किंवा त्यापूर्वी तळमजल्यावर अस्तित्वात असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक गाळेधारकांना या अतिरिक्त क्षेत्रफळ उपलब्ध करून देण्याच्या सशुल्क योजनेत सहभागी होता येईल. मात्र त्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्राप्त झालेला गुमास्ता परवाना, बेस्ट प्राधिकरणाने बसवलेले एलटी -२ वीज मीटरचे दस्तावेज गाळेधारकांनी सादर करणे आवश्यक आहे.

अपात्र गाळेधारकांनाही जागा उपलब्ध होणार
मालकी हक्काचा गाळा नसूनही भाडेकरारावर धारावीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आणि उद्योजकांनादेखील पुनर्विकासात सामावून घेण्याच्या धोरणाला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. या धोरणानुसार अशा (अपात्र) गाळेधारकांना पुनर्विकसित इमारतीत आरक्षित ठेवण्यात आलेली १० टक्के जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या महत्त्वाच्या निर्णयामुळे धारावीतील पात्र गाळेधारकांसोबतच अपात्र व्यावसायिकांनादेखील पुनर्विकसित धारावीत व्यवसायाची संधी उपलब्ध होणार असल्याचे डीआरपीने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

Asian Games 2026 Kabaddi : भारतीय पुरुष संघाचा दणदणीत विजय; गतविजेत्यांची दक्षिण कोरियावर ६३-३१ अशी मात

SCROLL FOR NEXT