मुंबई

मुंबईतील प्रश्नांसाठी ठाकरे दिल्लीत

CD

मुंबईतील प्रश्नांसाठी ठाकरे दिल्लीत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दिल्लीत दाखल झाले असून, मुंबईसह राज्यातील केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट ठरवली आहे.
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून भाजप सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न ते करीत असल्याचे बोलले जात आहे. बुधवारी संध्याकाळी आदित्य ठाकरे केंद्रीय जहाज आणि बंदर विकास मंत्री सदानंद सोनवाल यांची भेट घेणार असून, या बैठकीत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिपत्याखालील शिवडी पूर्व वसाहतींतील मूलभूत सुविधांचा अभाव तसेच शिवडीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे अडथळे या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी शिवडीचे खासदार आणि शिवसेना नेते अरविंद सावंत हेदेखील उपस्थित राहणार असून, त्यांनीच बीडीडी चाळ पुनर्विकासाचा मुद्दा केंद्र सरकारसमोर प्रभावीपणे मांडावा, असे नमूद केलेले पत्र आदित्य ठाकरेंना दिले आहे. शिवसेनेचा हा दौरा म्हणजे ‘मुंबईसाठी संघर्ष करणारी ताकद कोण?’ या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT