मुंबई

अंधेरी पूर्वेत इमारतीला आग

CD

अंधेरी पूर्वेत इमारतीला आग

मुंबई, ता. ६ : अंधेरी पूर्वेतील कुर्ला-अंधेरी रोडवरील शांतीनगर परिसरात असलेल्या सुमिता कॉम्प्लेक्समध्ये आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून प्राप्त माहितीनुसार, पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी ही आग लागली. घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या अग्निशमन दलाने लेव्हल-१ची आग जाहीर केली. ही आग तळमजला अधिक एक मजल्याच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे ६०० ते ७०० चौरस फूट क्षेत्रफळात पसरली होती. आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, विद्युत उपकरणे, सजावटीचे साहित्य, विविध प्रकारचे प्लॅस्टिक, कागदपत्रे, ऑफिस रेकॉर्ड्‌स व फर्निचर खाक झाले. अग्निशमन जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग अखेर सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. या आगीत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली आहे. या घटनेच्या कारणाचा तपास सुरू असून, विद्युत उपकरणांतील बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT