मुंबई

व्यवसाय वृद्धीसाठी कोर्सच्या निमित्ताने फसवणूक

CD

व्यवसायवृद्धी कोर्सच्या निमित्ताने फसवणूक
५००हून अधिक मराठी व्यक्ती लक्ष्य

मुंबई, ता. १० ः व्यवसाय दहा पटीने वाढवण्याचा कानमंत्र विशेष प्रशिक्षणाद्वारे (कोर्स) देण्याच्या निमित्ताने मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, नाशिकच्या पाचशेहून अधिक मराठी व्यावसायिक, व्यक्तींना अनोख्या पद्धतीने कोट्यवधींना लुबाडणाऱ्या स्नेहल कांबळे, पत्नी अर्चना यांना अटक करण्यात नवी मुंबई पोलिस अपयशी ठरले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून हे दाम्पत्य पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले आहे. त्यामुळे पोलिस कांबळे दाम्पत्याला पाठीशी घालत आहेत की काय, अशी भावना अस्वस्थ गुंतवणूकदारांमध्ये आहे.
‘गुन्हा नोंद होताच कांबळेने अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तेव्हापासून कांबळे पत्नीसह फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. तो हाती लागताच त्याने या पैशांचा विनियोग कसा केला, या गुन्ह्यात आणखी कोण कोण सहभागी आहे, ही स्पष्ट होऊ शकेल,’ असे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील तपासाशी संबंधित पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
या फसवणुकीबाबत महानगर प्रदेशातील सुमारे २०० व्यक्तींनी या वर्षी मार्च महिन्यात एपीएमसी मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. एमपीआयडी कायद्याची कलमे जोडण्याव्यक्तिरिक्त आर्थिक गुन्हे शाखेने कांबळे दाम्पत्याला अटक करण्यासाठी कोणतीही धडपड केलेली नाही, असा आरोप एमएमआरमधील गुंतवणूकदार करतात. एमएमआरव्यक्तिरिक्त पुणे आणि नाशिक येथील सुमारे ३०० व्यक्तींची आर्थिक फसवणूक या दाम्पत्याने केली आहे. या तिन्ही ठिकाणच्या गुंतवणूकदारांनी स्वतंत्र व्हॉट्सॲप समूह तयार करून समन्वय ठेवला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये विद्यार्थी, घरकाम करणाऱ्या महिलांपासून प्रथितयश डॉक्टर, इंजिनिअर, बँक व्यवस्थापक, व्यवसायिक अशा प्रत्येक आर्थिक स्तरांमधील मराठी व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या फसवणूक प्रकरणात देशातल्या अग्रगण्य खासगी वित्त संस्थेची भूमिका संशयास्पद असून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केलेला नाही, असा आरोपही गुंतवणूकदार करीत आहेत.
...
व्यवसायवृद्धीचा कोर्स
स्वतःला भारतातील एक नंबरचा बिझनेस कोच असे भासवणाऱ्या स्नेहल कांबळे याने ‘स्नेहलनीती’ नावे कंपनी सुरू केली. मुंबईत ठिकठिकाणी सेमिनार घेऊन मराठीबांधवांचा व्यवसाय दहा पटीने वाढवा, यासाठी ‘१० एक्स सिक्रेट’ हा विशेष कोर्स तयार केल्याचे जाहीर केले. त्याबाबतची जाहिरात समाजमाध्यमांवर केली. १.२५ लाख रुपयांत व्यवसायवृद्धीचा कोर्स शिकवला जाणार होता. या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्यांना (गुंतवणूकदारांना) दर महिना घरबसल्या ५० हजार ते एक लाखांचा नफा मिळेल, असे प्रलोभनही दाखवण्यात आले होते.
...
भागीदारीचे प्रलोभन
- जे गुंतवणूकदार या कोर्सची विक्री करतील त्यांना २० टक्के कमिशन दिले जाईल, असे प्रलोभन कांबळेने दाखवले. काहींना फ्रँचायझी भागीदार करून घेणार असल्याचे सांगत अधिकाधिक गुंतवणूक करून घेतली.
- कोर्सचे शुल्क रोख रकमेत घेण्याऐवजी कांबळेने खासगी वित्त संस्थेकडून शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यास सुरुवात केली. या कर्जाचे पहिले तीन हप्ते आपली कंपनी भरेल. चौथ्या महिन्यापर्यंत गुंतवणुकीवर होणाऱ्या नफ्यातून (२० टक्के) हे कर्ज आपोआप चुकते होईल, असा विश्वास त्याने दाखवला होता.
- ज्यांचा सिबिल स्कोअर कमी होता अशा व्यक्तींनाही ५० ते एक लाखापर्यंत कर्ज बहाल केले. काहींना मुंबई, पुणे, नाशिक येथील पतपेढ्यांमधून कर्ज मिळवून देण्यात आले. हे कर्ज खाते गुंतवणूकदाराच्या नावे असले तरी रक्कम ‘स्नेहलनीती’च्या खात्यावर वर्ग होत होती.
- जानेवारी महिन्यापासून हप्ते चुकल्याने आणि गुंतवणुकीवर नफ्याचा एकही छदाम न मिळाल्याने गुंतवणूकदार अस्वस्थ झाले. त्यानंतर कर्ज देणाऱ्या वित्त संस्थेने वसुलीसाठी गुंतवणूकदारांकडे तगादा लावला. वसुली एजंट घरी येऊ लागले, धमकावू लागले.
...
आम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम कांबळेने घेतली. ती रक्कम वित्त संस्था आमच्याकडून व्याजासह वसूल करते आहे. ज्या गोष्टीसाठी आम्ही हे कर्ज घेतले ती रक्कम आम्हाला मिळालीच नाही. या व्यवहारात कांबळे आणि वित्त संस्थेचा फायदा झाला. नुकसान, फसवणूक आमची झाली.
- आत्माराम मोरे, ठाणे
...
एरव्ही कर्ज सहजासहजी मिळते का? आम्हाला मात्र काही सेकंदात मंजूर झाले. तेही आधार, पॅन कार्ड, वीजबिल आदी कोणतीही कागदपत्रे न देता. हे शक्य आहे का? दुसरीकडे टॉरेससारख्या मोठ्या घोटाळ्याचा तपास पोलिस सहज करू शकतात; मात्र कांबळे, त्याच्या पत्नीचा पाच महिन्यांत शोध लावू शकत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. एकदा का आम्ही सर्वांनी कर्ज भरले की फसवणूक उरतेच कुठे? बहुधा त्याचीच वाट नवी मुंबई पोलिस पाहत असावेत.
- मानिनी वारळीकर, नवी मुंबई
...
मी नामांकित बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करत होतो. इन्स्टाग्रामवर घरबसल्या पैसे कमावण्याची कांबळेची जाहिरात पाहिली. नुकतेच घर घेतले होते. त्याचे कर्ज, घरखर्च यात ‘स्नेहलनीती’कडून अधिकचे उत्पन्न मिळेल, अशी आशा होती; मात्र सध्या ते कर्जही मलाच फेडावे लागत आहे. आमच्यापैकी अनेकांनी वित्त संस्थेच्या धाकाने, खराब सिबिल स्कोअर टिकवण्यासाठी कर्ज फेडण्यास सुरुवात केली आहे.
- प्रवीण सोनवणे, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabutarkhana: ...तर आम्ही शस्त्रही उचलू; जैन समाजाच्या मुनींची थेट धमकी, कबुतरखान्यांवरील बंदीचा वाद चिघळला

Devendra Fadnavis: 'ओबीसी समाज दुरावल्याने यात्रेची आठवण'; मंडल यात्रेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Manoj Jarange: मुंबईत आंदोलन करणारच : मनोज जरांगे; 'मराठा नेत्यांना भाजपमध्ये त्रास'

MP Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांनाही ‘ते’ दोघे भेटले: खासदार संजय राऊतांचा दावा; शरद पवारांच्या दाव्याचे समर्थन

Deputy Chief Minister: शिवसेना आपल्या पाठीशी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; श्रीनगरमध्ये घोडेवाल्याच्या कुटुंबीयांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT