मुंबई

रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिकेची मोहीम

CD

रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिकेची मोहीम
रस्त्यावर अडथळा ठरणारी ४,३२५ बेवारस वाहने आढळली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : सार्वजनिक रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या बेवारस आणि भंगार वाहनांवर महानगरपालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. मंगळवारपर्यंत (ता. १२) शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये चार हजार ३२५ बेवारस वाहने सापडली असून, त्यापैकी तीन हजार १५३ वाहनमालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत, तर एक हजार ९२७ वाहनांचे टोइंग करून कंत्राटदाराच्या यार्डमध्ये हलवण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई सुरू असून, रस्त्यांवरील अडगळ हटवून वाहतुकीस सुलभता मिळवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. शहर विभाग, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले असून, नागरिक तक्रार करण्यासाठी संबंधित विभागाच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर वाहनाचे छायाचित्र व लोकेशन पाठवू शकतात.
महापालिकेच्या नियमानुसार नोटीस मिळाल्यानंतर ७२ तासांत वाहन हटवले नाहीत, तर ते टोइंग करून यार्डमध्ये नेले जाते. ३० दिवसांत दंड भरला नाही, तर वाहनाची कायमची विल्हेवाट लावली जाते. रस्ते मोकळे ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

क्षेत्रनिहाय आकडेवारी
शहर विभाग : ८३३ वाहने आढळली, ५०२ नोटिसा, १४७ टोइंग
पूर्व उपनगरे : १,४४० वाहने आढळली, १,१३० नोटिसा, ७४० टोइंग
पश्चिम उपनगरे : २,०५२ वाहने आढळली, १,५२१ नोटिसा, १,०४० टोइंग

तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क :
शहर विभाग : ७५०५१२३४५६
पूर्व उपनगरे : ९८१९५४३०९२
पश्चिम उपनगरे : ८८२८८९६९०३

हेल्पलाइन : १९१६ किंवा संकेतस्थळ www.mcgm.gov.in
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Supreme Court: मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT