मुंबई

दहा हजार चालकांना एक कोटी दंड

CD

१० हजार चालकांना एक कोटी दंड
दहीहंडी उत्साहात; पण नियमांचे उल्लंघन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई शनिवारी दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला; मात्र या उत्सवात तरुणांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. वाहतूक पोलिसांनी १० हजार जणांना ई-चलान आकारले असून, याप्रकरणी एक कोटी १३ लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
वाहतूक नियम उल्लंघनामध्ये विनाहेल्मेट वाहन चालवणे, वेगाने वाहन चालवणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे आणि ट्रिपल सीट वाहन चालवणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. वाहतूक विभागाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमन करण्यासाठीच्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले होते.
सण उत्सवाच्या काळात वाहतूक नियम उल्लंघनात वाढ होते. मुंबईत दहीहंडीच्या काळात गोविंदा आणि प्रेक्षकदेखील मोठ्या संख्येने येतात. पोलिस अधिकाऱ्यांकडून सर्वांच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतात. मुंबईसह उपनगरांत नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसले. याबाबत मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवर शेकडो तक्रारींचा पाऊस पडला होता. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, बऱ्याच ठिकाणी चायनीज हॉर्नचा वापर करणे, विनाहेल्मेट गाडी चालविणे, ट्रिपल सीटसह मोठमोठ्याने लाउडस्पीकर वाजवत ध्वनिप्रदूषण करण्याचा प्रकार घडला.
...
आम्ही वाहतूक नियम उल्लंघन तपासण्यासाठी विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेत असून, ज्या ठिकाणी आवश्यक आहे, त्या ठिकाणी अतिरिक्त चलान जारी केले जातील.
- अनिल कुंभारे, सह पोलिस आयुक्त, वाहतूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच पडले बंद

SCROLL FOR NEXT