मुंबई

मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीची दाणादण

CD

मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीची दाणादाण
शहर आणि उपनगरात ३.५ फुटापर्यंत पाणी साचले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः मुंबईत दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीची दाणादाण उडाली. शहर आणि उपनगरांत अर्ध्या फुटापासून ३.५ फुटापर्यंत पाणी साचले. त्यामुळे कुठे वाहतुकीला ब्रेक लागला, तर कुठे कासवगतीने सुरू होती. पावसामुळे अनेकांना लेटमार्क लागला, काही जणांनी घरीच राहून काम करणे पसंत केले.
कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणचे सखल भाग जलमय झाले असून त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. गोल देऊळ, गुलालवाडी, वडाळा, शिवडी, नबाब टॅन्क, नागपाडा, मराठा मंदिर, भायखळा, बावला कंपाउंड, भोईवाडा, वडाळा स्टेशन चार रस्ता, हिंदमाता जंक्शन, माटुंगा या भागात दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. काही वेळानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
मुंबईत सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दादर टीटी, ट्रॉम्बे, महाराष्ट्रनगर सबवे, अँटॉप हील या ठिकाणी एमजी आर चौक, कानेकर नगर, सरदारनगर, प्रतीक्षानगर, त्याचप्रमाणे दादर टीटी या भागातही दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला. याशिवाय मालाड सब वे गोरेगाव येथे दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले असल्याने त्या ठिकाणची वाहतूक एमटीएनएल जंक्शनमार्गे वळवण्यात आली होती. त्यामुळे तेथील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. याशिवाय दादर टीटी गांधी मार्केट, वरळी नाका उत्तर वाहिनी, वांद्रे बँडस्टँड, जे.जे. मार्ग, हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, वाकोला रामनगर सबवे येथे पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरात जोडणाऱ्या मार्गिकांवरील वाहतूक कासवगतीने सुरू होती.
माटुंगा येथील गांधी मार्केट परिसरात दीड फूट पाणी साचले होते. हिंदमाता येथे वाहतूक संथ गतीने सुरू होती. पायधुनी डीडी जंक्शन येथेही पाणी साचले होते. पावसाने ब्रेक घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. याशिवाय पश्चिम उपनगरातील अंधेरी बर्फीवाला रोड, डी. एन. रोड येथे एक फूट पाणी साचले होते. वाकोला पुलावरील पानबाई स्कूल येथील जंक्शन परिसरात एक फूट पाणी साचले असून खार सब वे येथेही पाणी साचले होते.
पाणी साचल्यामुळे अंधेरी सब वे बंद करण्यात आला होता. तेथील वाहतूक इतर ठिकाणी वळवण्यात आली आहे. हयात जंक्शन ते हंसभूग्रा जंक्शन याठिकाणी तीन ते साडेतीन फूट पाणी साचल्याने दक्षिणवाहिनीकडे येणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. याशिवाय मालाड सब वे, समतानगर पोईसर सब वे येथेही पाणी साचले होते. पाणी साचल्याने आरे कार शेड रोडवर मरोळ युनिट क्रमांक १९ (दिंडोशी)कडे जाणारी वाहतूक संथगतीने दुपारी पाऊस कमी झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

वाहने बंद पडली
पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग व पूर्व मुक्त मार्ग येथील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. ठिकठिकाणी वाहने बंद पडल्यामुळेही वाहतुकीचा वेग मंदावला. वडाळा टीटी येथे ट्रक बिघडल्यामुळे तेथील वाहतूकही संथ गतीने सुरू होती.
बेस्ट बसच्या बिघाडामुळे पंकज शाह बाबा दर्गा एलबीएस मार्ग (घाटकोपर) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक मंदावली होती.
टॅक्सी ब्रेकडाउनमुळे पोल क्रमांक १०७ ईस्टर्न एफडब्ल्यूवाय (वडाळा) दक्षिण बाउंड येथे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. ही वाहने काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

वाहतूक पोलिस, पालिका कर्मचाऱ्यांची मदत
परळ येथील शिरोडकर मार्केट येथे पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने या ठिकाणी वाहतूक पोलिस नागरिकांना मार्ग काढण्यास मदत केली.
ओबेरॉय जंक्शन येथे पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती; मात्र या ठिकाणी मदतीसाठी पोलिस अंमलदार तसेच पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे; मात्र या पावसात मुंबईकरांना कोणती अडचण येऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस अहोरात्र मेहनत घेत आहेत. कित्येक ठिकाणी दोन-तीन फूट पाणी साचले असतानादेखील वाहतूक नियमनाचे काम केले, तर काही वाहतूक पोलिसांनी बंद पडलेल्या गाड्या स्वतः बाहेर काढल्या. मुसळधार पावसातही आपले कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिस आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन आहे.
- डॉ. प्रियंका नारनवरे, अपर पोलिस आयुक्त, वाहतूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ८ तासांच्या प्रतिक्षेनंतर जीवनवाहिनी पुन्हा सुरु

ISRO: 'इस्रो'कडून होतेय ४० मजली उंचीच्या यानाची निर्मिती; अध्यक्ष व्ही. नारायण यांनी दिली सखोल माहिती

SCROLL FOR NEXT