तुळशी तलावाच्या दुपटीपेक्षा जास्त पाण्याचा उपसा
चार दिवसांत तब्बल १,६४५ कोटी लिटर पाणी उपसले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : गेल्या चार दिवसांत मुसळधार पावसाने मुंबईकरांना अक्षरशः हैराण केले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले, तर रेल्वे वाहतूक व बेस्ट सेवा विस्कळित झाली. अशा परिस्थितीत शहराला पाण्याखाली जाण्यापासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उदंचन केंद्रांनी तब्बल १,६४५ कोटी लिटर पाणी उपसून सुमारे तुळशी तलावाच्या दुपटीपेक्षा जास्त पाण्याचा उपसा झाला. १६ ऑगस्टच्या सकाळपासून १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अवघ्या चार दिवसांत सर्व सहा उदंचन केंद्रांनी केलेल्या या प्रचंड उपशामुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली. या कालावधीत पंप एकूण ७६१ तास अखंड कार्यरत राहिले.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलावाची साठवण क्षमता सुमारे ८०४.६ कोटी लिटर आहे. त्याच्या दुपटीपेक्षा जास्त म्हणजे १,६४५.१५५ कोटी लिटर पाणी महापालिकेच्या उदंचन केंद्रांतून उपसण्यात आले. पावसाचे प्रमाण किती विक्राळ होते. निचऱ्याची व्यवस्था किती दमदारपणे कार्यरत राहिली याची प्रचिती येते.
सर्वाधिक उपसा ‘इर्ला’कडून
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, १६ ते १९ ऑगस्ट या चार दिवसांत इर्ला उदंचन केंद्राने सर्वाधिक ३,७६८.४८ दशलक्ष लिटर पाणी उपसले. याखालोखाल क्लीव्हलँड बंदर – २,९०६.०२ दशलक्ष लिटर, गजदरबंध – २,८७०.११ दशलक्ष लिटर, लव्हग्रोव्ह – २,८२६.५० दशलक्ष लिटर, हाजी अली – २,३७९.७८ दशलक्ष लिटर, ब्रिटानिया – १,७००.६७ दशलक्ष लिटर याप्रमाणे एकूण १६,४५१.५५ दशलक्ष लिटर म्हणजे १,६४५.१५५ कोटी लिटर पावसाचे पाणी उपसण्यात आले.
५४० मोबाइल पंपांची मदत
स्थिर उदंचन केंद्रांशिवाय मुंबई महापालिकेकडे आणखी ५४० मोबाइल पंप आहेत. हे पंप विशेषतः सखल भागांमध्ये तैनात केले जातात. १९ ऑगस्ट रोजी सकाळी मुसळधार पावसामुळे अवघ्या सहा तासांत या मोबाइल पंपांद्वारे १८२.५ कोटी लिटर पाणी उपसले. या पंपांचे संचालन प्रशिक्षित मनुष्यबळाद्वारे तीन शिफ्टमध्ये केले जाते. त्यामुळे पाऊस कितीही मुसळधार झाला तरी साचलेले पाणी त्वरित बाहेर काढणे शक्य झाले.
२४ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस
मुंबईत १८ ऑगस्ट सकाळी ८ ते १९ ऑगस्ट सकाळी ८ या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली.
शहर विभाग
दादर कार्यशाळा – ३०० मिमी
वडाळा शाळा – २८२ मिमी
फॉर्सबेरी जलाशय – २६५ मिमी
.........
पश्चिम उपनगर :
चिंचोली – ३६१ मिमी
कांदिवली – ३३७ मिमी
दिंडोशी शाळा – ३०५ मिमी
मागाठाणे – ३०४ मिमी
........
पूर्व उपनगर :
चेंबूर – २९७ मिमी
विक्रोळी – २९३ मिमी
पवई – २९० मिमी
विणानगर – २८८ मिमी
अवघ्या चार तासांत पुन्हा १०० मिमी पाऊस
१९ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ या अवघ्या चार तासांतच शहरात पुन्हा मुसळधार पाऊस झाला.
फॉर्सबेरी जलाशय – १०९ मिमी
चिंचोली – १०७ मिमी
वर्सोवा – १०६ मिमी
दादर – १०३ मिमी
मुलुंड – १०० मिमी
याशिवाय वडाळा शाळा – ९९ मिमी, नायर रुग्णालय – ९४ मिमी, गव्हाणपाडा – ९५ मिमी, वीणानगर शाळा – ९३ मिमी अशी पावसाची नोंद झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.