मुंबई

मुंबई पूर्वपदावर

CD

मुंबई पूर्वपदावर
पावसाचा जोर ओसरला; रस्ते-रेल्वेसेवा सुरळीत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन अक्षरशः ठप्प झाले होते. रस्ते जलमय, बाजारपेठा सुनसान, शाळा-बाजार बंद, तर वीजपुरवठाही ठप्प झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. दरम्यान, बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरताच मुंबई हळूहळू पूर्वपदावर आली. रस्ते वाहतुकीसह लोकल सेवा, बेस्ट सेवाही सुरळीत सुरू झाली.
दोन दिवसांच्या रखडपट्टीनंतर मुंबई पूर्वपदावर आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मिठी नदीतील पूर ओसरला असून, पाण्याची पातळी सर्वसाधारण झाल्याने सखल भागांतील पाणी ओसरले. त्यामुळे रस्ते मोकळे झाले व वाहतूक सुरळीत झाली. घरात शिरलेले पाणीही ओसरताच रहिवाशांनी पुन्हा दैनंदिन जीवनात गती आणली. स्वच्छता मोहिमेनंतर दुपारपासून बाजारपेठा गजबजायला लागल्या. रस्ते व पदपथांवर साचलेला प्रचंड कचरा हटवण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र झटून काम केले. त्यांचा वेगवान प्रतिसाद असल्याने मुंबईचे चित्र दुपारनंतर बऱ्याच प्रमाणात उजळले. पावसामुळे ओढवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुंबईकरांनी मोठ्या धीराने सामना केला. मुसळधार पावसाने शहरास काही तासांसाठी जखडून ठेवले, पण त्यातून सावरून मुंबई पुन्हा नव्या जोमाने धावू लागली आहे. संकटे आली तरी न थांबता पुढे जाण्याची मुंबईची जिद्द पुन्हा एकदा दिसली.
---
शाळा, महाविद्यालये सुरू
मुंबईतील शाळांना बुधवारी सुट्टी जाहीर केली नसली तरी खबरदारी म्हणून काही खासगी शाळांनी सुट्टी दिली होती; तरीही बहुतांश शाळा व महाविद्यालये सुरू होत्या. पावसामुळे बऱ्याच भागात वीजपुरवठा खंडित झाला होता; मात्र बुधवारी दुपारपर्यंत बहुतांश परिसरात वीज पूर्ववत झाली. त्यामुळे रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
----
बेस्टची वाहतूक नियमित
मुसळधार पावसाचा बेस्ट बससेवेलाही फटका बसला होता. अनेक बसगाड्या बंद पडल्या, तर काही मार्ग बंद करण्यात आले. आज मात्र बहुतेक मार्गांवरील वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.
----
लोकल वाहतूक पूर्वपदावर
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारी उसंत घेतल्याने लोकल वाहतूक पूर्वपदावर आली. सकाळच्या सत्रात मुख्य मार्गावर व हार्बर मार्गावर काही गाड्या पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होत्या; मात्र दिवसभर वाहतूक सुरळीत सुरू राहिल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.
---
महामुंबईला यलो अलर्ट
मुंबईसह ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात बुधवारी पावसाचा जोर ओसरला. पुढील २४ तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने महामुंबई परिसरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर,काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT