गाझातील नरसंहार त्वरित थांबवा
आझाद मैदानात सर्वपक्षीय सभेत मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : इस्राईलच्या वतीने गाझामध्ये सुरू असलेला नरसंहार थांबवा. नरसंहार करण्याचा गुन्हा इस्राईल करीत आहे, अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी आज बुधवारी (ता. २०) आझाद मैदानात केली.
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (धर्मनिरपेक्ष) यांच्या वतीने आज आझाद मैदानावर पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेण्यात आली.
गाझावर कायमस्वरूपी ताबा मिळविण्याचे कारस्थान इस्रायली राजवट करीत आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयानेदेखील इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षणमंत्री यांना युद्ध गुन्हा आणि नरसंहार यासाठी दोषी ठरविले आहे. त्यांच्या अटकेसाठी समन्सही काढले आहे, असे कॉम्रेड प्रकाश रेड्डी म्हणाले. संपूर्ण जगभरात गाझातील नरसंहार थांबवावा, यासाठी जबरदस्त अशी आंदोलने होत असताना मुंबई पोलिस मात्र आझाद मैदान येथे आंदोलन करण्याची परवानगी वारंवार नाकारत असल्याचेही ते म्हणाले.
अमेरिकन साम्राज्यवादाच्या पाठिंब्याने इस्राईल गाझा पट्टीमध्ये सातत्याने बॉम्बफेक करीत आहे, तेथील लोकांची उपासमार करून नरसंहार करीत आहे. हे ताबडतोब थांबवण्याच्या मागणीसाठी आपण एकत्र आलो आहोत, असे खासदार हुसेन दलवाई म्हणाले.
माकपचे कॉ. एस. के. रेगे, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे, भाकपचे सुभाष लांडे, ख्यातनाम पत्रकार पी. साईनाथ, सईद मिर्झा, सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर, राजू कोरडे आदी या वेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.