कामा रुग्णालयातील मिल्क बँक मुलांसाठी वरदान
-७२६ मातांकडून २४८ लिटर दुधाचे दान
मुंबई, ता. २१ : नवजात अर्भकांना आईचे दूध अमृतासमान असते; पण काही मातांना पान्हाच फुटत नाही. त्यामुळे अर्भकांची भूक भागविण्यासाठी मातांना गायीचे दूध किंवा बेबी फूड द्यावे लागते. अशा बालकांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे मातृ दुग्धपेढी वरदान ठरते. स्वतःच्या बाळाची भूक भागवून राहिलेले दूध माता दान करतात. या मिल्क बँकच्या माध्यमातून आईच्या दुधाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बालकांची भूक या निमित्ताने पूर्ण होत आहे. या कामा रुग्णालयातील मिल्क बँकेत सहा महिन्यांत ७२६ मातांकडून २४८ दूध जमा झाले. त्यातील २३६ लिटर १४६१ बालकांना देण्यात आले.
या मिल्क बँकमध्ये माता दूधदाता (डोनर)कडून इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप मशीनद्वारे दूध घेतले जाते. ते पाश्चराईज्ड केले जाते. त्यानंतर त्या दुधाची लॅबमधून ‘मायक्रो बायोलॉजिकल’ टेस्ट केली जाते. दुधाच्या गुणवत्तेनंतर आणि प्रमाणानुसार प्रत्येक मातेचे दूध काचेच्या बाटलीमध्ये मायनस ० ते आठ डिग्री सेल्सियसमध्ये ठेवले जाते. या बँकेमध्ये सहा महिन्यांपर्यंत दूध संकलित केले जाते. त्यासाठी मायनस आठ ते २० डिग्री सेल्सियसनुसार डीप फ्रिजमध्ये सुरक्षित राहते. गरजेनुसार नवजात बालकांना दूध देण्यात येते.
कामा ह्युमन मिल्क बँक वर्ष २०२४
दूध संकलन - ४१५ लिटर
वापरलेले दूध- ४०७ लिटर
एकूण माता दात्या - २,१८५
मुलांची संख्या - २३५८
......
२०२५ संकलन मिलिमीटर
जानेवारी - ५०.२९०
फेब्रुवारी - ३१,३६५
मार्च - ३७.२५५
एप्रिल - ४३.२३५
मे - ४३.७१५
जून - ४२.६६५
एकूण - २४८.५२५ लिटर