महिला बचत गटांचा ‘मोदक महोत्सव’
मुंबई, ता. २१ : मुंबईत गणेशोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या सहाय्याने चालणाऱ्या महिला बचत गटांकडून यंदा ‘मोदक महोत्सव २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. बाप्पाच्या नैवेद्यातील सर्वात पहिला मानाचा पदार्थ असलेले उकडीचे व तळलेले मोदक आता थेट घरपोच उपलब्ध होणार आहेत.
सोमवारी (ता. २५) नागरिक https://shgeshop.com या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. त्यानंतर बुधवारी (ता. २७) म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशीच ऑर्डर केलेले मोदक घरपोच मिळणार आहेत. मोदकांना गणेशोत्सवात मोठी मागणी असते. त्यामुळे महिला बचत गटांच्या माध्यमातून बनवलेले दर्जेदार मोदक ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार असल्याची माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.