चाकरमानी निघाले गावाक..!
गणेशोत्सवासाठी पाच हजार एसटी बस आरक्षित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : कोकणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी सज्ज झाले आहेत. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुविधेसाठी पाच हजार एसटी बस सोडण्यात येणार आहे; मात्र गुरुवार (ता. २१)पर्यंत ५,०१६ बस आरक्षित झाल्या आहेत.
गणेशोत्सवानिमित्त कुटुंबीयांसह गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यंदा बुधवार (ता. २७) गणेश चतुर्थी असून मुंबई, ठाणे व पालघर विभागांतून कोकणात जाणाऱ्यांनी एसटीला पसंती दिली आहे. मुंबईतून कोकणातील थेट गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच सुखरूप पोहोचवते. त्यामुळे एसटीच्या ४,३९२ एसटीचे गट आरक्षण झाले एकूण ५,०१६ जादा बस पूर्ण आरक्षित झाल्या आहेत. गणेशोत्सवासाठी व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकीटदरात सवलत दिली जात आहे. यंदा एसटीतर्फे सुमारे पाच हजार जादा एसटी बस सोडण्यात येणार आहेत. आतापर्यंत ५,०१६ बसचे आरक्षण झाल्याने आणखी १६ बस वाढविण्यात आल्या आहेत.
---
वाहनदुरुस्ती पथक सज्ज
गणेशोत्सव काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानके व बसथांब्यांवर एसटीचे अधिकारी-कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी तात्पुरती प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
===
विभागनिहाय एसटीचे आरक्षण
विभाग गट आरक्षण पूर्ण आरक्षण अंशतः आरक्षण एकूण
मुंबई १,५९४ २०४ १० १,८०९
ठाणे २,३०२ ३२५ ४४ २,६७१
पालघर ४९५ ३३ ८ ५३६
एकूण ४,३९२ ५६२ ६२ ५,०१६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.