पवईत पोलिसांवर दगडफेक
अवैध झोपड्यांवरील कारवाईदरम्यान घटना
मुंबई ता. २१ ः पवईतील हिरानंदानी येथील जय भीम नगरात गुरुवारी सकाळी अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पालिका व पोलिसांच्या पथकावर स्थानिकांनी दगडफेक केली. या घटनेत काही पोलिस जखमी झाल्याचे समजते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जय भीम नगरातील पदपथावरील झोपड्या हटविण्याची कारवाई पालिकेने पोलिस बंदोबस्तासह हाती घेतली आहे, परंतु कारवाईदरम्यान संतप्त नागरिकांनी अचानक दगडफेक सुरू केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने मध्यवर्ती रस्ता दोन्ही बाजूंनी बंद केला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीही झाली, मात्र पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे अखेरीस झोपड्या तोडून हटवण्यात आल्या.
गतवर्षीही झाली होती दगडफेक
हिरानंदानी परिसर हा शहरातील उच्चभ्रू मानला जातो. २००७ मध्ये काही कामगारांसाठी तात्पुरत्या स्वरूपात वसाहत उभी करण्यात आली होती. कालांतराने त्यावर अतिक्रमण झाले आणि कायमस्वरूपी झोपड्या उभ्या राहिल्या. गेल्या वर्षीच पालिकेने सुमारे ८०० झोपड्या तोडल्या होत्या. त्या वेळीही पालिका अधिकारी व पोलिसांवर दगडफेक झाली होती. त्या वेळी २५ जण जखमी झाले होते. दरम्यान, पवई व तिरंदाज गाव परिसरातील सुमारे ५०० अवैध बांधकामांबाबत राज्य मानवाधिकार आयोगाने कारवाई करण्याचे आदेश मनपाला दिले होते. त्यानुसार मनपाने झोपडीधारकांना नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये ४८ तासांत झोपड्या स्वतःहून न हटवल्यास मनपा पाडकाम करेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी पुन्हा ही कारवाई करण्यात आली.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.